www.satyarthigroups.com
असे समजूनच एक पाऊल पुढे चालण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आजच्या काळात मोबाईल हा प्रत्येक घरात आणि घरातील प्रत्येकांच्या हातात आहे. त्यामुळे बातमी व्हायरल / स्प्रेड व्हायला वेळ लागत नाही. जगातील कोणतीही घटना वाचकांपर्यंत एका 'क्लिकवर' सहज पोहोचते.
त्यामुळे मोबाईल हे प्रभावी माहितीस्त्रोताचे 'अस्त्र' ठरत आहे. माहिती व तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे अख्ख्ये जग आता 'मुठीत' असल्यासारखे वाटते. धावपळ, ताणतणावाच्या आयुष्यात वाचकांकडे उपलब्ध असणारा वेळ लक्षात घेऊन मोबाईलवर सुविधा देण्याचा हा प्रयत्न आहे.
आमच्या डिजिटल न्यूज वेबसाईटवर आलेली बातमी वस्तुनिष्ठ अथवा 'सत्यार्थी' आहे किंवा नाही. याबाबत वाचकांना किंतू - परंतु वाटणार नाही. याची शाश्वती आम्ही नक्कीच देऊ. विश्वासार्हता हीच आमची मोठी ताकद राहिल. वाचकांच्या सूचनांचे नेहमीच स्वागत ..!!