Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना 'तारीख पे तारीख'; अंगणवाडी 'ताईं'नाही ठेवले वंचित, थकित अनुदान मिळेना!

पैसे कधी मिळणार? लाभार्थींचा सवाल


 विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे (Mukhyamantri Mazhi ladki Bahin Yojana)लाॅंचिग केले. परंतु आता याच लाडक्या बहिणींना अनुदानासाठी 'तारीख पे तारीख' दिली जात आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थीच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महीना संपून आता मार्च महिना सुरू झाला आहे. त्यामुळे  पैसे कधी मिळणार ?असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज आॅनलाईन भरून सबमिट केले त्या अंगणवाडी सेविकांनाही (Anganwadi Sevika) रक्कम देण्यापासून वंचित ठेवले आहे. परिणामी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ अशा योजनांसारखी अवस्था लाडकी बहिण योजनेची होते की काय? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शासनाने नवीन नियम लागू करून बहुतांश लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या निकषांत ज्या बहिणी पात्र आहेत. अशानांच आता हे अनुदान मिळणार आहे.नव्या निकषांनुसार, हे पैसे जमा होतील. सुरुवातीला सरसकट महिलांसाठी असणारी ही योजना आता निकषाच्या जाळ्यात अडकत आहे. लाडकी बहीण योजनेची जुलै २०२४ महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी होत्या. त्यांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात येत होते. 

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात असून निकषांत न बसणाऱ्या महिलांन वगळून फक्त गरजू बहि‍णींनाच योजनेचा लाभ देण्याचे प्रकार समोर येत आहे. या पडताळणीनंतर आत्तापर्यंत राज्यात एकूण ९ लाख बहिणी बाद झाल्या आहेत. दरम्यान तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या ८४ हजार लाडक्या बहिणी आहेत. जानेवारी महिन्याचे १५०० रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाले होते. 

मात्र फेब्रुवारी महीना उलटून आता मार्च लागला.पण तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही जमा झालेले नाहीत. महिन्याच्या अखेरीस तरी रक्कम खात्यावर पडतील. अशी अपेक्षा बहिणींना होती. शेवटी ही अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे या योजनेची अवस्था शासनाच्या अन्य योजनांसारखी होते की काय? अशीही भीती व्यक्त केली जात आहे.


अंगणवाडी ताईंनाही रकमेची प्रतीक्षा 

एकीकडे लाडक्या बहिणींना 'तारीख पे तारीख' देऊन झुलविले जात आहे तर दुसरीकडे अंगणवाडी ताईंनाही रक्कम देण्यापासून वंचित ठेवले आहे. योजना सुरू होण्यापूर्वी लाडक्या बहिणींचे अर्ज आॅनलाईन भरण्यासाठी सेविकांना ५० रुपये देण्याचे शासनाने कबुल केले होते. परंतु सहा महिने उलटूनही सेविकांना कामाची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे सेविकाही रकमेच्या प्रतीक्षेत आहेत.



मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे अनुदान अजूनही खात्यावर जमा झाले नाही. याशिवाय या योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी ताईंनाही अद्याप छदाम मिळाला नाही. इमानदारीने कामे करूनही सेविकांना रकमेपासून वंचित ठेवले जात आहे.

- माया म्हस्के, अंगणवाडी सेविका, वैजापूर

Post a Comment

0 Comments