Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Farmer Loss | घरात आग लागली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं! लाखोंचा कापूस भस्मसात; 'या' गावातील घटना

बेलगाव शिवारातील घटना 


राहत्या घरात साठवून ठेवलेला ४५ क्विंटल कापूस आग लागून जळून खाक झाला. ही घटना १ मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील बेलगाव शिवारात घडली. यामध्ये आनंदा सुकाजी त्रिभुवन या शेतकऱ्याचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

बेलगाव शिवारातील गट क्र. १७७
मध्ये आनंदा त्रिभुवन यांचे शेत असून या शेतातील पत्र्याच्या खोलीत त्यांनी स्वतःच्या शेतातून वेचलेला ४५ क्विंटल कापूस भाव वाढीच्या आशेने साठवून ठेवला होता. या कापसाला शनिवारी रात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच धाव घेऊन आग विझविली.

 मात्र, तोपर्यंत सर्व कापूस जळून खाक झाला होता. यात त्रिभुवन यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी तहसीलच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, आगीत झालेल्या कपाशीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्रिभुवन यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे सोमवारी केली आहे.

Post a Comment

0 Comments