Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Dhananjay Munde's Resignation | अखेर मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा

मस्साजोग हत्या प्रकरण भोवले


बीड ( Beed) जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख ( Massajog Sarpanch Santosh Deshmukh) यांच्या निघृण हत्येचे फोटो (Murder Photo) सोशल मीडियावर (Social media)व्हायरल (Viral ) झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे ( Minister of Food and Civil Supplies Dhananjay Munde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief minister Devendra Fadnavis) यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी आपल्या पीए व ओएसडींच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तत्काळ स्वीकारला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. आता या राजीनामा प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments