Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Check Bounce | धनादेश बाऊन्स; आरोपीस महिन्याचा सश्रम कारावास

५० हजार रुपयांची नुकसानभरपाई द्या


वैजापूर शहरातील (Vaijapur City) एका पतसंस्थेकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आल्याप्रकरणी आरोपीस एक महिना सश्रम कारावास व ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश ( Court Order) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस.पिसाळ यांनी दिले आहेत.                           
भागवत परभत जगताप (५८ रा.भग्गाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी भागवत जगताप याने सन - २०१६ मध्ये रेणुकामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून १५  हजार रुपये कर्ज घेतले होते. 

ही रक्कम ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे पतसंस्थेने आरोपीकडे  थकित रकमेची मागणी केली. अखेर आरोपीने संबंधित पतसंस्थेस ४ ऑक्टोबर २०२१ रोजी  औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा  शाखा वैजापूर (Aurangabad District Central Co-opp Bank) ४४ हजार ५१२ रुपयांचा धनादेश दिला. हा धनादेश वटविण्यासाठी पतसंस्थेने बँकेत पाठविला. 

परंतु आरोपीच्या खात्यावर पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश न वटता अनादरित (Check Bounce) होऊन तो परत आला. दरम्यान पतसंस्थेतर्फे व्यवस्थापक संजय शिंदे यांनी वैजापूर येथील न्यायालयात ॲड. एस. एस. ठोळे यांच्यामार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती.

 न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील फिर्याद, सबळ साक्षीपुरावा व युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपी भागवत जगताप यास एक महिना सश्रम कारवास ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. एस. एस. ठोळे व ॲड. आकाश ठोळे यांनी कामकाज पाहिले.

Post a Comment

0 Comments