Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Atrocitie | पाणी भरण्यावरून 'त्या' मायलेकीस शिविगाळ; दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा

जिवे मारण्याची धमकी 


सार्वजनिक बोअरवर (Public Borewell) पाणी भरण्याच्या वादातून मायलेकीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघी महिलेंकीसह चौघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात (Vaijapur Police station) ॲट्राॅसिटी कायद्यान्वये (Atrocitie Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

             जयमाला वाघ, सौ. राठोड, जगदाळे, सौरभ नेवगे (सर्व रा. वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सपना काशीनाथ थोरात (३५ रा. रोटेगाव ता. वैजापूर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की त्या आई सीताबाईसोबत राहतात. तीन महिन्यांपूर्वी वैजापूर ते रोटेगाव रोडवर हॉटेल मातोश्रीमागे महेश श्रीवास्तव यांच्या नावे असलेले रो - हाऊस घेण्यासाठी त्यांनी इसारपावती करून घेतली. ते रो हाऊस त्यांना आठ दिवसांत खरेदी करायचे होते. 

२४ फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास पाणी भरण्यासाठी त्या रोहाऊस समोरील सार्वजनिक बोअरवर गेल्या असता त्या ठिकाणी राहणाऱ्या जयमाला वाघ, सौ. राठोड, जगदाळे, सौरभ नेवगे यांनी तुम्ही येथे पाणी भरायचे नाही, असे म्हणून चापटबुक्क्यांनी मारहाण करून पाणी भरण्याचा पाईप हिसकावून घेतला.

 जातिवाचक शिवीगाळ करून तुम्ही लोकांनी या ठिकाणी पाणी भरायचे नाही. येथे पाणी भरण्यासाठी आले तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाह, अशी धमकी दिली. त्यानंतर या चौघांनीही सपना थोरात यांच्या घरात घुसून घरातील भिंतीला लावलेले महापुरुषांचे फोटो काढून टाकून धार्मिक भावना दुखावल्या. तुम्ही कसे काय घर विकत घेता तेच पाहते, असेही धमकावले. त्यामुळे सपना थोरात व त्यांच्या आईने वैजापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी जयमाला वाघ, सौ. राठोड, जगदाळे, सौरभ नेवगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे करत आहेत.

Post a Comment

0 Comments