Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Girl Molestion | 'ते' बापलेक म्हणाले, मुलीचे लग्न लावून दाखवाच; अन्यथा संपवून टाकू, काय आहे प्रकरण?

जिवे मारण्याची धमकी; खंडाळा येथील घटना 
 प्रेमप्रकरणातून 'प्रेमवेड्या' तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून वडिलांच्या सोबतीने मुलीच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात नुकतीच समोर आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

                  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित मुलगी ही वैजापूर तालुक्यातील रहिवासी असून इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असून सध्या तिची परीक्षा सुरू आहे. दरम्यान तिचे एका मुलाशी ओळख होती. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या काळात दोघांचे फोनवरून वेळोवेळी बोलणे होत असे. 

संभाषणा दरम्यान तरुण पीडित मुलीला 'आपण दोघे पळून जाऊन लग्न करू' अशी फुस लावत होता. परंतु 'मी बारावीमध्ये असून मला माझे करिअर घडवायचे आहे. त्यामुळे मी सध्या लग्नाच्या विचारात नाही' असे मुलगी त्याला सांगत असे. तरी तो तिला वेळोवेळी फोन करीत होता. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पीडितेच्या घरी कुणीही नसताना तरुण तिच्या घरात घुसला व तिचा विनयभंग करून 'चल आपण पळून जाऊ' असे म्हटला. परंतु मुलीने आरडाओरड केल्याने त्याने तिथून पळून काढला. 


यानंतर १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तरुण हा त्याच्या बापासह पीडित मुलीच्या घरी गेला व तिच्या आई-वडिलांना म्हणाले 'की तुमची मुलगी आम्हाला द्या.' परंतु तिच्या आई-वडिलांनी 'आमच्या मुलीचे सध्या लग्न करायचे नाही' असे त्या दोघांना सांगितले. यावर दोघा बाप-बेट्यांनी त्यांना शिवीगाळ करत 'तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न इतर ठिकाणी केले तर तुम्हाला तुमच्या मुलीसह जीवंत ठार मारू'अशी धमकी त्यांना दिली. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments