Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Khandala Grampanchayat | 'तू कोण आहे रे' म्हणत 'त्याने' कर्मचाऱ्याच्याच 'श्रीमुखात' लगावली! काय आहे कारण?


खंडाळा येथील घटना; एकाविरुद्ध गुन्हा  


वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                                

संदीप प्रकाश थोरात (रा.खंडाळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश पवार हे खंडाळा ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून कार्यरत आहे.  शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते व इतर कर्मचारी ग्रामपंचायतीत कार्यरत असताना त्या ठिकाणी गावातीलच संदीप थोरात हा आला. त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग सुरू केली.

 यावेळी ग्रामपंचायत कार्यालयातील पाणी पुरवठा कर्मचारी शैलेश काळे,सफाई कामगार सुनील पेहरकर, वसुली लिपिक राहुल थोरात व शिपाई कैलास बागुल यांना त्याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तू कोण आहे रे ? तुझे पद काय आहे ? तुझे ओळखपत्र कुठे आहे ? तू काय काम करतो ? तुमचा ग्रामसेवक कुठे आहे ? अशी चौकशी करू लागला. हा सर्व प्रकार सुरू असताना लिपिक योगेश पवार यांनी त्याला हटकले व भाऊ तुमचे काय काम आहे ? आम्ही तुमचे काम लगेच करून देतो असे म्हटले. 

या दरम्यान संदीप याने पाणी पुरवठा कर्मचारी शैलेश काळे यांच्या श्रीमुखात भडकावून चापटबुक्यांनी मारहाण केली तर भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणारे योगेश पवार यांना देखील त्याने शिवीगाळ करून चापट बुक्यांनी मारहाण केली. याशिवाय 'तुम्हाला जास्त माज आला आहे तुम्ही माझ्या नादाला जाशाल तर तुम्हाला जीवंत मारून टाकेल' असे म्हणून जीवे मारण्याच्या धमक्या देऊन निघून गेला.

Post a Comment

0 Comments