Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Bharosa Cell | 'त्या' ५१३ पती-पत्नीचेे संसार पुन्हा जुळले; पोलिसांच्या 'भरोसा'ने केल्या रेशीमगाठी घट्ट!

  समुपदेशनाने आयुष्यात आनंदाचे क्षण

छत्रपती संभाजीनगर:  शहर पोलिस प्रशासनाचे 'भरोसा' सेल महिलांच्या सबलतेसाठी, न्याय हक्कांसाठी व त्यांना आधार देण्यासाठी यशस्वी ठरले आहे. या सेलच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ५१३ महिलांचे विस्कटलेले संसार सावरले आहेत. नवरा-बायको, सासू-सुनाची भांडणे, तसेच इतर कारणांमुळे हे संरार थेट घटस्फोटापर्यंत पोहोचले होते.

 'भरोसा'च्या संपूर्ण चमूने समुदेशन करत या संसारांना सावरण्याचे काम केले. नवरा बायकोच्या एकूण १५५६ दाखल तक्रार अर्जापैकी ५१३ प्रकरणांमध्ये पुन्हा समेट घडवून आणत, त्यांचा संसार फुलवला आहे. शहरात कौटुंबिक वादातून दररोज अनेक गुन्हे दाखल होतात. त्यात नवरा-बायकोचे भांडण, महिलांना मारहाण, छळ अशा गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अनेक संसार थेट घटस्फोटापर्यंत पोहोचतात. मात्र, विस्कटलेल्या अशा संसारावर घटस्फोटाची वेळच देवू नये, जवरा बायकोच्या भांडणात त्यांच्या मुलांची ससेहोलपट होऊ नये, याच उद्देशाने पोलिस प्रशासनात 'भरोसा' सेल चालवला जातो.


सहा कर्मचारी करतात समुपदेशन 

भरोसा सेल मध्ये १० कर्मचारी आहेत. त्यातील दररोज ५ ते ६ कर्मचारी ३० ते ३५ तक्रारदारांचे समोपदेशन करतात. विशेष म्हणजे जानेवारी २०२५ मध्ये १३९ नव्याने अर्ज आले असून २८५ अर्ज हे प्रलंबित आहेत. त्यामुळे अर्जाची संख्या ४२९ झाली असून त्यातील ३० अर्ज हे समोपदेशन करुन संसार जुळविण्यात आले आहेत. तर ५४ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तसेच ४० अर्ज हे पोलिस ठाण्याला वर्ग करण्यात आली आहेत.


दांपत्याच्या भांडणाची प्रमुख कारणे

- पती किवा पत्नीचा मोबाइलचा अति वापर

- सासु-सासरे वगळून पती सोबत वेगळी राहण्याची अपेक्षा

- लग्नाआधी दिलेला शब्द लग्नानंतर पूर्ण न करणे

- दारूचे व्यसन

- काम करुन पैसे कमाविणाऱ्या महिलांची मानसिकता 

समुपदेशनासह तज्ज्ञांकडून उपचार

समुपदेशनामुळे नवरा-बायकोचे आपसातील वाद मिटले. त्यामुळे त्यांचे विस्कटलेले संसार पुन्हा उभे राहिले आहेत. काही प्रकरणे प्रलंबित असून त्यांचे समुपदेशनाचे काम सुरु आहे. तर काहींवर मानसोपचार सुरु आहेत. काहींना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचे कामही 'भरोसा' करत आहे. सेल मध्ये दररोज सरासरी ३ ते ४ अर्ज येतात तर ९ ते १० अर्ज हे पोलिस ठाण्यात वर्ग करावी लागतात. 


दिवसेंदिवस लहान कुटुंब पद्धती होत चाचली आहे. छोट छोट्या कारणावरुन संसार मोडण्यापेक्षा मैत्रीपूर्ण नाते ठेवून एकमेकांना समजून घेतल्यास संसार सुखाचा होईल. टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे संसारासाठी कोणी एकाने माधार घेणे गरजेचे आहे. ज्यांना मुलं आहेत अशांनीतर नक्कीच एकादे पाऊल मागे घ्यावे. अन्यथा त्या चिमुकल्याचे भविष्य अंधाकारमय होतं. हॉटेलिंग, फिरण, या गोष्टी बाबत आर्थिक क्षमता किती आहे, किंवा आपण कोठुन आलो आहोत याचा विचार करुन आपण फार अपेक्षा न ठेवणे गरजेचे आहे. एकमेकांना दोष न देता समजूतीने वागावे. तरच संसार सुखाचा होईल. 
- तेजश्री पाचपुते, पोलिस निरीक्षक भरोसा सेल


पती-पत्नीने एकमेकांना वेळ देवून समजून घ्यायला हवे. खर्च कुठे करावा याचे नियोजन करायला हवे. लग्नाआधि दिलेले सगळे कमिटमेंट पूर्ण होत नसतात. त्यात तडजोड करावी लागते. हे महिलांनी समजून घ्यायला हवे.
-उज्वला देशमुख, भरोसा, सेल समुपदेशक

Post a Comment

0 Comments