Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Anganwadi Recruitment | वैजापूर तालुक्यात 'एवढ्या' पदांसाठी भरती प्रक्रिया; सेविका, मदतनिसांच्या जागा भरणार

२५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

वैजापूर  येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्यावतीने वैजापूर तालुक्यात रिक्त असलेल्य अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांची १८ व मदतनीस १६७ अशा एकूण १८५ पदासाठी इच्छुक महिलांकडून २५ फेब्रुवारीपर्यत मागविण्यात आले आहेत.



वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण, परसोडा, भिंगी, चोरवाघलगाव, जानेफळ, नांदुरढोक, लाखगंगा, गोयगाव, खंबाळा, वाघला, बिरोळा, बळहेगाव, बाभुळतेल, नादी, मालेगाव कन्नड, अमानतपूरवाडी, सफियाबादवाडी या गावांत अंगणवाडी सेविकांची पदे भरली जाणार आहेत. शासनाने सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे मोठ्या अंगणवाडी केंद्रात रुपांतर केले असल्यामुळे तालुक्यातील सर्व मिनी अंगणवाडी केंद्र असलेल्या ठिकाणी मदतनीस पदभरती करण्यात येणार आहे.


 सेविका, मदतनीस पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता १२वी उत्तीर्ण आवश्यक आहे. अन्य जादा शैक्षणिक पात्रता, जाती, जमाती, विधवा महिला, अनाथ आदी घटकांना भरती प्रक्रियेत प्राधान्य आहे. या भरतीसाठी १८ ते ३५ वर्षे वयोमर्यादा आहे.

Post a Comment

0 Comments