दुचाकी विद्युत खांबावर धडकली!
भरधाव दुचाकी विद्युत खांबावर जाऊन धडकल्याने २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना ५ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील धोंदलगाव येथे घडली.
हेही वाचा: चालकाला 'डुलकी' लागली अन् 'त्या' दोघांच्या जिवावर बेतली!
ऋषिकेश पंजाब वाघ ( वय २२ रा. धोंदलगाव) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ऋषिकेश हा दुचाकीवरून जात असताना धोंदलगाव शिवारातील अंबिकानगर देवीच्या मंदिराजवळ विद्युत खांबावर धडकून त्याचा अपघात झाला. ही घटना सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
हेही वाचा: दारू पाजून खून! पोलिसांना न्यायालयाची चपराक; 'त्या' दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करा
रस्त्याच्या बाजूला दोन विद्युत खांब होते. दोन्ही खांबाच्या मधोमध लोखंडी अॅंगलचा आडवा सपोर्ट दिलेला होता. याच अॅंगलला ऋषिकेश जाऊन धडकला. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला.
हेही वाचा: 'ते' दोघे विद्युतपंप घेऊन जात होते; कारच्या धडकेत सर्वच संपलं!
अपघातानंतर गावातील नागरिकांनी त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात् वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे अधिक तपास हवालदार किरण गोरे करीत आहेत.
हेही वाचा: 'शेअर बाजारा'तून गंडविण्याचा अनोखा 'गोरखधंदा'
काळाने त्याला गाठलेच!
साधारणतः चार वर्षांपूर्वीही ऋषिकेशचा अपघात होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा तो कोमात गेला होता. असे गावकऱ्यांनी सांगितले. एका अपघातातून ऋषिकेश वाचला होता. परंतु दुसऱ्या घटनेत काळाने त्याला गाठून इहलोकातून घेऊन गेला.
0 Comments