Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Check Bounce | धनादेश अनादरप्रकरणी 'त्या' महिलेला सश्रम कारावास; न्यायालयाचा आदेश

७५ हजार रुपये देण्याचेही आदेश


वैजापूर येथील एका पतसंस्थेकडून कर्जापोटी घेतलेल्या रकमेच्या परताव्यासाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत झाल्याप्रकरणी आरोपीस ६ महीने सश्रम कारावास तसेच ७५ हजार रुपये नुकसाभरपाई पतसंस्थेस देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिले आहेत.

हेही वाचा: 'तो' म्हणाला नवऱ्याला फारकत दे अन् माझ्याशी लग्न कर; 'तिच्यावर' चाकूहल्ला!

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील वैजापूर नागरी सहकारी पतसंस्थेकडून  स्वाती फुलचंद मालोदे (४० रा. वैजापूर) यांनी २५  डिसेंबर २०१७ रोजी ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाऊ घेतलेल्या रकमेची ठरल्याप्रमाणे परतफेड न केल्यामुळे पतसंस्थेने मालोदेकडे रकमेची मागणी केली असता त्यांनी पतसंस्थेच्या नावाने ३१ डिसेंबर २०१८ रोजीचा ५९,४४२ रुपयांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंचा धनादेश दिला होता.

हेही वाचा: लग्नाची तयारी झाली अन् तोच पोहोचला पोलिसांचा ताफा!

 त्यानंतर तो धनादेश लोकविकास बॅंकेत  वटविण्यासाठी टाकला. परंतु पुरेशा रकमेअभावी धनादेश न वटता अनादरीत होऊन परत आला. त्यामुळे पतसंस्थेने संबधितास नोटीस पाठवून धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले होते. परंतु नोटीस मिळूनही मालोदे यांनी धनदेशाची रक्कम जमा केली नाही. त्यामुळे पतसंस्थेने  वैजापूर येथील न्यायालयात धाव घेऊन ॲड. मजहर बेग यांचयामार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती. 

हेही वाचा: 'त्या' बहाद्दराने बनावट खाते केले अन् 'तिचे' आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल!

न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील परिपूर्ण फिर्याद, साक्षीपुरावा व फिर्यादीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादाच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात फिर्यादी पतसंस्थेतर्फे ॲड. मजहर बेग यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments