Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Crime | सासऱ्याच्या 'कृष्णलीला' पाहून 'ती' हादरली अन् थेट पोलिस ठाण्यात गेली!

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 


'माहेराहून दहा तोळे सोने व बुलेट मोटार सायकल घेऊन ये' असे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करून तिचा विनयभंग करणाऱ्या सासऱ्यासह सासरच्या अन्य मंडळीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  पतीसह सासरा, सासू व नणंद या चौघांचा यात समावेश आहे. 



          याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित विवाहिता ही उच्चशिक्षित असून ती तालुक्यातील एका खेड्यात सध्या रहिवासास आहे. मागील वर्षी जून महिन्यात तिचा विवाह जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील एका तरुणाशी पार पडला.  लग्न समारंभात तिच्या आई-वडिलांनी सासरच्या मंडळींनी योग्य मानपान देऊन लग्न लावून दिले होते. लग्नानंतर सासरी नांदण्यासाठी जाताच पती व सासरच्या अन्य मंडळींनी तिचा मानसिक व शारीरिक छळ करत 'माहेराहून १० लाख रुपये व एक बुलेट मोटारसायकल घेऊन ये' अशी मागणी करण्यास सुरुवात केली. मात्र आईवडिलांनी  पाहुण्यांकडून १५ लाख उसने घेऊन लग्न लावले होते. असे सांगत पीडितेने सासरच्यांची मागणी फेटाळून लावली. या दरम्यान तिच्या माहेराच्या मंडळींनीही पाहुण्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्यांचे काही एक ऐकले नाही. या दरम्यान एके दिवशी रात्री पीडितेचा पती घरी नसताना तिचा सासरा तिच्या बेडरूम मध्ये घुसला आणि तिचा हात पकडून  जवळ ओढले व  म्हणाला की 'मी तुला काही कमी पडू देणार नाही. तू मला खूप आवडतेस, तुझा नवरा चिखलाचा गोळा आहे. त्याला चॉकलेट देऊन बाजुला बसवतो.'  सासऱ्याच्या कृष्णलीला पाहून पीडीता चांगलीच हादरली. लगेचच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी सासऱ्याने तेथून पळ काढला. दरम्यान तिची सासू व नणंद पीडितेच्या बेडरूममध्ये आल्या. तिने त्यांना सर्व हकीकत सांगितली. परंतु त्यांनी उलट पीडितेच्याच चारित्र्यावर संशय घेतला व तिला लाथाबुक्यांनी मारहाण करून माहेराहून सोने व बुलेट आण अशी मागणी केली..याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरुद्ध विविध कलमान्वये वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments