Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Crime News | चोरट्यांनी दुकान फोडले, लाखो रुपयांचा डल्ला! 'या' गावातील घटना

सव्वाचार लाखांचे वायर लंपास 

                                     

एका मोटार रिवायडींगचे दुकान फोडून चोरट्यांनी चार लाखांची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना ०८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे उघडकीस आली. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: कांदा व्यापाऱ्यांसाठी आता नवीन नियमावली; काय आहे वाचा

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र मेंढे (रा.एकोडीसागज) यांचे महालगाव येथे गुरुदत्त मशनरी अँड रिवायडींग दुकान आहे. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद करून ते घरी परतले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यावेळी कुणीतरी चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडल्याचे त्यांना समजले. 

हेही वाचा: वाहनाच्या धडकेत जागेवरच सर्व संपलं!

त्यांनी दुकानात जाऊन बघितले असता दुकानातून चार लाख २० हजार २९५ रुपये किंमतीचे कॉपर वायर चोरी गेल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार मनोज पाटील  करीत आहेत.

Post a Comment

0 Comments