विनयभंगही केला; पोलिस ठाण्यात गुन्हा
महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करीत चाकूहल्ला करणाऱ्या एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर शहरातील मध्यवर्ती भागात १ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा: लग्नाची तयारी झाली अन् तोच पोहोचला पोलिसांचा ताफा!
इस्माईल याकुब शेख (रा. येवला, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित महिला ही वैजापूर शहरातील मध्यवर्ती भागात रहिवासास आहे. तिचा व पतीचा कौटुंबिक वाद सुरू असल्याने ती पतीपासून विभक्त माहेरी राहते.
हेही वाचा: 'फोडा आणि राज्य करा', दुभाजकाची तोडफोड
दरम्यान इस्माईल शेख हा महिलेच्या सासरी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. मागील काही दिवसांपासून तो पीडितेला सतत फोन करून त्रास देत होता व 'तुझ्या नवऱ्याला फारकती देऊन टाक, माझ्यासोबत लग्न करून घे' असे म्हणत होता.
हेही वाचा: पंचगंगा: सव्वालाख टन ऊस गाळपाचा गाठला टप्पा!
परंतु महिला त्याला नकार देत होती. दरम्यान शनिवारी महिला तिच्या माहेरी असताना पहाटे चार वाजेच्या सुमारास इस्माईल तिच्या घरात घुसला व तिचा विनयभंग करून चाकूने तिच्यावर हल्ला केला. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments