Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Accident | वाहनाच्या धडकेत जागेवरच सर्व संपलं; वैजापूर तालुक्यातील घटना

आयशरची दुचाकीला धडक!


 भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना लासूरगाव शिवारात  ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. 

         हेही वाचा: मिशन निवडणूक: घरकुलांसाठी 'भावी' सदस्यांची 'चमकोगिरी'           

  रमेश तुकाराम माळी (५३ रा.जेहूर कुंभारी ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर) असे घटनेतील मृताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश माळी हे शुक्रवारी दुपारी नागपूर-मुंबई महामार्गावरून दुचाकीने (एम.एच.१७ सी.डब्लू.६५४५) जात होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते तालुक्यातील लासुरगाव शिवारात बलई पुलाजवळ पोहोचले. 

हेही वाचा: अबब.! १६ हजार कामांचे भिजत घोंगडे!

रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव आयशरने (एम.एच.२०जी.सी.३७९९) समोरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी त्यांचा मुलगा चेतन माळी याने दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील हवालदार किरण गोरे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments