Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Court Order| दारू पाजून संपवलं! पोलिसांना न्यायालयाची चपराक, 'त्या' दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करा

वैजापूर येथील न्यायालयाचे आदेश


 एका ६५ वर्षीय वृद्धाला दारू पाजत नाक दाबून त्यांचा खून करणाऱ्या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश येथील  प्रथमवर्ग  न्यायालयाने पोलिसांना  दिले आहे. साधारणतः ११ महिन्यांपूर्वी वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी टाळाटाळ करून फिर्यादीला कोलून लावले होते. परंतु न्यायालयाने हा आदेश पोलिसांना देऊन सणसणीत चपराक दिली आहे

    शिवलाल लक्ष्मण गायकवाड ( ६५ रा. नांदगाव ) असे मृताचे नाव आहे तर सुभाष सुजीराम कोल्हे व भरत सखाहरी निकम (दोघे रा.नांदगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयाने आदेशीत केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील फिर्यादी संतोष शिवलाल गायकवाड (३१) हा वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथील शेत गट क्रमांक १२१ मध्ये रहिवासास आहेत. त्याचे व सुभाष कोल्हे व भरत निकम यांचे कौटुंबिक संबंध पूर्वीपासूनच चांगले नाहीत. तसेच ते दोघे या ना त्या कारणाने शिवलाल गायकवाड यांचा मुलगा संतोष गायकवाड याच्या कुटूंबाला त्रास देत असे.

हेही वाचा; कारने धडक दिली अन् सर्वच संपलं!

 सुभाष व भरत या दोघांचे गावात दीप हॉटेल आहे. १६ मार्च २०२४ रोजी संतोष याचे वडील शिवलाल लक्ष्मण गायकवाड यांनी कांदे विकल्याने कांद्याची पट्टी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान दुपारी चार वाजेच्या सुमारास संतोष याच्या घरी घटनेतील एक साक्षीदार आला व त्याने त्याला सांगितले की, ' तुझे वडील हाॅटेल दीपमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले आहेत'. असे समजताच संतोष हा साक्षीदाराच्या मोटारसायकलवर बसून हॉटेल दीपमध्ये पोहोचला. त्या ठिकाणी त्याचे वडील एका खाटावर बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. 

हेही वाचा: 'शेअर बाजारा'तून गंडविण्याचा अनोखा 'गोरखधंदा'!

त्यानंतर संतोष याने त्याच्या वडिलांना दवाखान्यात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यावेळी आरोपी व गावातील अन्य नागरिकांनी गाडीतून त्यांना घरी आणले. त्यानंतर संतोष हा वडिलांचा मृतदेह पोस्टमाॅर्टेम करण्यासाठी घेऊन जाण्याच्या तयारीत होता. मात्र मृत माणसाची चिरफाड करायची नाही. असं म्हणून आरोपीने जबरदस्तीने गाडीत टाकून त्यांना घरी आणले. यावेळी आरोपीने लवकर अंत्यसंस्कार करून टाकू म्हणून घाई केली व मृतास स्मशानभूमीत न नेता रात्री दहा वाजता शेतात जाळून अंत्यसंस्कार करून टाकले. 

हेही वाचा: धनादेश अनादर प्रकरणी महिलेस सश्रम कारावास!

फिर्यादी संतोष याच्या परंपरेनुसार मृताचा अंत्यविधी हा पुरून करावयाचा असतो. मात्र ते दुःखात असल्याने हा सर्व घटनाक्रम समजला नाही. मात्र अंत्यविधी पार पडल्यानंतर संतोष याच्या मेहुण्यास एका साक्षीदाराने सांगितले की, मृत शिवलाल गायकवाड हे कांद्याचे पैसे मिळाल्यावर दीप हॉटेलवर अगोदरच दारू पिऊन आले होते. त्यावेळी आरोपीने शिवलाल यांना सांगितले की, तू जर सात बाटल्या दारू पिला तर तुला पाच हजार रुपये देवू. मात्र शिवलाल हे अगोदरच दारू पिलेले असल्याने ते जास्त दारू पिऊ शकले नाही. यावेळी शिवलाल हे खाटेवर पडले.  

हेही वाचा: 'तो' म्हणाला नवऱ्याला फारकत दे अन् माझ्याशी लग्न कर; 'तिच्या'वर चाकूहल्ला!

भरत निकम याने त्यांना खाटेवर बसविले व सुभाषने त्यांचे नाक दाबून जबरदस्तीने त्यांच्या तोंडात दारू ओतल्याने शिवलाल यांना त्रास होऊ लागला. परिणामी ते बेशुद्ध झाले व डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  दरम्यान याबाबत संतोष गायकवाड याने न्यायालयात धाव घेऊन प्रकरण दाखल केले. याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान यांनी उपरोक्त दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादी पक्षातर्फे अॅड. यासेरअली सय्यद यांनी काम पाहिले.

पंचगंगा: सव्वालाख टन ऊस गाळपाचा गाठला टप्पा!

पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ 

दरम्यान या घटनेची फिर्याद देण्यासाठी फिर्यादी वैजापूर पोलिस ठाण्यात गेले. परंतु पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा दाखल करून घेतला नाही. या सर्व घटनाक्रमा दरम्यान आरोपी सुभाष कोल्हे याने फिर्यादी संतोष यांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली व तुला पण तुझ्या बापासारखे मारून टाकू असे धमकावले. यानंतर मयत शिवलाल यांच्या पत्नी शोभाबाई याने उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षकांना (ग्रामीण) देखील अर्ज केला होता .परंतु आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.

Post a Comment

0 Comments