शासनाकडे मंजुरीसाठी सादर
वैजापूर शहरातील कुंटुबांना दररोज पिण्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी नगरपलिकेने ५० कोटी खर्चाचा नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीला पाठवला असल्याची महिती शिवसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली.नगरविकास विभागाच्या निधीतून श्रीराम काॅलनी व साईनाथ नागरी वसाहतीत आ. बोरनारे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या पावणे पाच कोटी निधीतील विकास कामाचे लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात बोरनारे बोलत होते.
हेही वाचा: मिशन निवडणूक: घरकुलांसाठी 'भावी' सदस्यांची 'चमकोगिरी'
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर होते.माजी सभापती बाबासाहेब जगताप, संजय निकम ,डॉ. राजीव डोंगरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. नगरपलिकेने २०१२ या वर्षात लोकार्पण केलेल्या अर्धवट पाणीपुरवठा योजनेत साठवण क्षमतेसाठी पुरेसे जलकुंभाची निर्मिती न केल्याने कुंटुबांना पिण्यासाठी दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याची बाब डिसेंबर महिन्यात नगरपालिका प्रशासनाच्या बैठकीत समोर आल्याचे आ. बोरनारे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा: एका अपघातात बचावला; दुसऱ्यात काळाचा घाला!
तसेच जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्ती न केल्याने बंद स्थितीत असून नागरिकांना तीन ते चार दिवसाआड थातूर-मातूर प्रक्रिया केलेले पाणी पिण्यासाठी उपलब्ध करुन दिले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यामुळे नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचा विस्तार करण्यासाठी ५० कोटींचा नवीन प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहराला नवीन वर्षात निधीचे गिफ्ट देण्याचे साकडे घातल्याचे बोरनारे यांनी सांगितले.
हेही वाचा: चालकाला 'डुलकी' लागली अन् 'त्या' दोघांच्या जिवावर बेतली!
अध्यक्षीय समारोपात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी स्वातंत्र्यानंतर वैजापूर मतदारसंघात आ.बोरनारे यांनी तीन हजार कोटींचा विकास निधी उपलब्ध करुन देण्याचा विक्रम करणारे ते लोकप्रतिनिधी असल्याचे म्हटले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती.
0 Comments