Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Mregs | अबब..! १६ हजार कामांचे 'भिजत घोंगडे', 'सरकारी काम अन् वर्षानुवर्षे थांब'

यंत्रणेसह लाभार्थ्यांची उदासीनता 


'सरकारी काम अन् सहा महिने थांब' हा वाक्प्रचार सर्वश्रुत आहेच. पण आता या वाक्प्रचारात बदल करण्याची वेळ आली आहे. 'सरकारी काम अन् वर्षानुवर्षे थांब' असा वाक्प्रचार करावा लागणार आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या प्रलंबित कामांची संख्या पाहता 'मग्रारोहयो' विभाग नेमका काय करतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. 'मग्रारोहयो'तर्गंत वैजापूर तालुक्यात १६ हजार २३५ कामांचे भिजत घोंगडे पडले आहे. साधारणतः तीन वर्षांपासून कामांची ही अवस्था आहे. त्यामुळे ही कामे कधी पूर्णत्वास जाणार? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.

हेही वाचा: पाणीपुरवठा: वैजापूरकरांसाठी 'एवढ्या' कोटींच्या वाढीव योजनेचा प्रस्ताव; आमदारांची माहिती

'मग्रारोहयो'च्या कामांची अवस्था वैजापूर तालुक्यात भयावह झाली आहे. कामांना मंजुरी तात्काळ मिळते. परंतु त्या तुलनेत कामे पूर्ण करण्यासह अनुदान खात्यावर पडण्याची गती संथ आहे. परिणामी प्रलंबित कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याला जबाबदार संबंधित यंत्रणा की लाभार्थी? हा मात्र संशोधनाचा विषय असला तरी या बाबींना दोन्हीही घटक तेवढेच जबाबदार आहेत. असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 

हेही वाचा: एका अपघातात बचावला: दुसऱ्यात काळाचा घाला!

'रोहयोतर्गंत' वैयक्तिक सिंचन विहिरींसह शेततळे, घरकुले, पाणंद रस्ते, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रस्ते, गायगोठे आदी कामे केली जातात. चालू वर्षातील कामांची स्थिती धक्कादायक आहे. कामे मोठ्या प्रमाणावर मंजूर झाली असली तरी यातील बहुतांश कामे रेंगाळत पडली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी मंजूर होऊन सुरू झालेली कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही. या कामांच्या अडथळ्यांमुळे नवीन कामांना मंजुरी देण्यासाठी ब्रेक लागला आहे. 

हेही वाचा: चालकाला 'डुलकी' लागली अन् 'त्या' दोघांच्या जिवावर बेतली!

साधारणतः दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अगोदरची कामे पूर्णत्वास गेल्याशिवाय तालुक्यात 'रोहयोतर्गंत' नवीन कामांना मंजुरी देऊ नका. अशा स्पष्ट लेखी सूचना पंचायत समितीच्या 'रोहयो' विभागाला दिल्या आहेत. याशिवाय 'रोहयो' आयुक्तांनीही ( नागपूर) हाच फतवा काढून कित्ता गिरवला.

हेही वाचा: दारू पाजून संपवलं! न्यायालयाची पोलिसांना चपराक; 'त्या' दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करा

 परिणामी तालुक्यातील बहुतांश कामे मजुरींना 'खो' बसला आहे. ६० - ४० कामांचे प्रमाण संतुलित ठेवणे अवघड झाल्याने गुंता अधिकच वाढत चालला आहे.याशिवाय कामे सुरू करून अर्धवट सोडलेल्या कामांमुळे नवीन कामांना मंजुरी देण्यास अडचणी येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

काय आहे 'रोहयो'च्या कामांची स्थिती?

 दरम्यान सध्यस्थितीत म्हणजेच चालू वर्षात १२ हजार ९५५ कामे मंजूर आहेत. गंमतीचा भाग म्हणजे मंजूर कामांपेक्षा प्रलंबित कामांची संख्या अधिक आहे. प्रलंबित कामांची संख्या १६ हजार २३५ आहे. तालुक्यात १० हजार ३३८ गायगोठे मंजूर असून यापैकी ५ हजार ६९३ कामे अद्याप सुरूच झाले नाही. यातही मोजक्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान पडले. 

हेही वाचा: 'ते' दोघे विद्युतपंप घेऊन जात होते; कारच्या धडकेत सर्वच संपलं!

५७८ मातोश्री पाणंद रस्ते मंजूर असून यापैकी ३२३ कामे सुरू झालेली नाहीत. वैयक्तिक लाभाच्या ७ हजार ६८८ विहिरी मंजूर असून २ हजार ९३९ विहिरींची कामे अजूनही सुरू नाही. कामापोटी अकुशल मजुरी ५९९८ लक्ष वाटप तर कुशल मजुरीपोटी १ हजार ३३२ लक्ष रुपये वाटप केल्याचा दावा पंचायत समिती प्रशासनाने केला आहे. चालू आर्थिक वर्ष संपत आले तरी कामांची अवस्था भयावह आहे.

पाच लाखांचे गाजर!

शासनाने वैयक्तिक सिंचन विहिरींसाठी अनुदान वाढवून पाच लाखांपर्यंत केले खरे. शासनाने याबाबत आदेश काढून जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला. परंतु या रकमेच्या एकाही लाभार्थ्यांच्या विहिरीस मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे शासनाने लाभार्थ्यांना रकमेचे केवळ 'गाजर' दाखविले काय? असा भ्रम लाभार्थ्यांचा झाला आहे.

Post a Comment

0 Comments