शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून अत्याचार केल्याची घटना १४ जानेवारी उघडकीस आली. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील पारळा येथील १७ वर्षीय मुलगी ही शिऊर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दरम्यान ०७ जानेवारी रोजी सकाळी वाजेच्या सुमारास मुलीने 'कॉलेजला जाते' असे म्हणून घरातुन बाहेर पडली. रोज दुपारी ती चार वाजेपर्यँत कॉलेजमधून घरी यायची. परंतु त्या दिवशी ती घरी आली नाही. यामुळे कुटुंबियांनी कॉलेजमध्ये जाऊन तिचा शोध घेतला असता 'आज ती कॉलेजला आलीच नाही' असे त्यांना समजले.
त्यांनी तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. त्यामुळे मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान १४ जानेवारी रोजी 'ती' मुलगी पोलिसांना मिळून आली. यावेळी अधिक विचारपूस केली असता तिने सांगितले की, चोरवाघलगाव येथील नात्यातीलच मुलाशी माझे प्रेमसंबंध असून तो मुलगा मला शिऊर येथे भेटण्यासाठी आला होता.
आईवडील आमचे लग्न जमवत नसल्याने तो मुलगा व मी शिऊर येथून आम्ही बसने कोपरगाव येथे गेलो तेथे बससथानकावरच राहिलो. त्यांनतर आम्ही संगमनेर येथे गेलो तेथून नारायणगाय व मग मंचर येथे एका लॉजवर राहीलो. त्यांनतर माझ्या मामाने फोन करून 'तुमचे लग्न लावून देतो तुम्ही घरी या' असे सांगितले. नंतर आमच्याकडे पैसे नसल्याने आम्ही वैजापूरला परत आलो' असे सांगितले. दरम्यान शिऊर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
0 Comments