Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Onion Scam | कांदा घोटाळा: 'त्या' व्यापाऱ्याने 'एवढ्या' महिन्यांचे शुल्क थकविले; मग बाजार समितीने व्यवहार कसा करू दिला? धनादेश कशाच्या आधारे वाटले? सहायक निबंधकांकडून विचारणा

सभापतींसह सचिवांना बजावली नोटीस 

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील जय बालाजी ट्रेडिंग कंपनीचा मालक व कांदा व्यापारी सागर सुनील राजपूत याच्याकडे मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून बाजार समितीचे शुल्कापोटी रक्कम प्रलंबित असताना त्याला कांदा खरेदीचा व्यवहार का करु दिला? अशी विचारणा करणारी नोटीस सहायक निबंधक के.एम. चौधरी यांनी शुक्रवारी (११ जानेवारी) बाजार समितीचे सभापती व सचिवांना बजावली आहे. तसेच सागर राजपूत याच्याकडून वसूल करण्यात आलेल्या रकमेतून काही शेतकऱ्यांना रक्कम वाटप करण्यात आली. ही रक्कम कशाच्या आधारे वाटप करण्यात आली? याचा तपशील सादर करण्याचे आदेश सहायक निबंधकांनी बाजार समितीला दिले आहेत. 


सागर राजपूत याने जवळपास ४०० कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करुन त्यांचे दोन कोटी रुपये न देता फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बाजार समितीने सागर राजपूत याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पोलिस या प्रकरणाचा तपास  करत आहेत. 


हेही वाचा: 'आम्ही सारे खवय्ये', गैरव्यवहारास सर्वच जबाबदार


परंतु पैसे परत करण्यासाठी बाजार समितीने फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना दहा जानेवारीची मुदत उलटली असतांनाही शेतकऱ्यांच्या पदरात पैसे पडले नसल्याने त्यांनी बाजार समितीच्या आवारातच बेमुदत उपोषण सुरु केले आहे.‌ 


शेतकऱ्यांंना धनादेश दिलेच कसे?

बाजार समितीने यातील काही शेतकऱ्यांना तीस हजार रुपयांचे चेक दिले असले तरी यातून सर्वच शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी एकत्र आले आहेत. गणेश तांबे, नीलेश गायकवाडसह अन्य शेतकऱ्यांनी सहायक निबंधक चौधरी यांची भेट घेऊन सागर राजपूत याच्याकडे बाजार फी प्रलंबित असताना त्याला समितीने कांद्याचा व्यवहार का करु दिला व बाजार समितीने कोणत्या आधारे काही शेतकऱ्यांना रकमेचे वाटप केले.

 

हेही वाचा: हजारोंचा नायलॉन मांजा पकडला


या मुद्द्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यावरुन सहायक निबंधकांनी बाजार समितीला नोटीस काढून वरील बाबींची विचारणा केली असून याबाबत माहिती सादर करुन शेतकऱ्यांना उपोषणापासुन परावृत्त करण्याची सुचना नोटीसीव्दारे केली आहे.


पाणी कुठंतरी मुरतंय?

दरम्यान सहायक निबंधकांकडून बजावण्यात आलेल्या नोटीसीमुळे बाजार समितीच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सागर राजपूत याच्याकडे चार महिन्यांपासून बाजार समितीचे शुल्क थकित अहतानाही तो कांदा खरेदी करीत होता. यावरून बाजार समितीचा गलथान कारभार अधोरेखित होतो. 


हेही वाचा: सभापती वाढदिवसात अन् शेतकरी उपोषणात!


शुल्क थकवूनही कर्मचारी त्याला पाठीशी घालत होते. याचाच अर्थ पाणी कुठंतरी मुरतंय? हे स्पष्ट होतं. दुसरीकडे बाजार समितीने यातील काही शेतकऱ्यांना रक्कम वाटप केली. ही कशाच्या आधारे वाटप केली? अशीही विचारणा निंबधकांनी केली आहे. त्यामुळे बाजार समितीचे सभापती व सचिव या नोटीसीला काय उत्तर देणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे.


'रंगीसंगीत' बैठकीला पुष्टी

संबंधित व्यापारी व समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये 'मधूर' संबंध आहेत. याची खुलेपणाने आता चर्चा सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांची व्यापाऱ्यासोबत 'रंगीतसंगीत' उठबस या बाबीही आता झाकून राहिल्या नाहीत. समितीच्या थकित शुल्कावरून या बाबींना आता एका अर्थाने पुष्टीच मिळाली आहे. असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

Post a Comment

0 Comments