Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

viral | 'त्या' बहाद्दराने बनावट खाते केले अन् 'तिचे' आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल!


वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 


नवविवाहित तरुणीचे फेक इंस्टाग्राम खाते तयार करून तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केल्याच्या संशयावरून एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा: लग्नाची तयारी झाली अन् तोच पोहोचला पोलिसांचा ताफा!

          शिवाजी सोमासे (रा.नारळा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील पीडित मुलीचे महिनाभरापूर्वी लग्न झालेले आहे. दरम्यान २७ जानेवारी रोजी तिच्या चुलत भावाने तरुणीच्या वडिलांना फोन करून माहिती दिली की, कुणीतरी अज्ञात इसमाने  त्यांच्या मुलीचे इंस्टाग्रामवर तिचे खोटे खाते (आयडी) तयार केले असून त्यावर तिचे आक्षेपार्ह फोटो ठेवलेले आहेत.

हेही वाचा: 'त्या' दोघांनी फोटो काढून केला तिचा विनयभंग!

 ते फोटो तरुणीच्या घरच्यांनी पुतण्याच्या मोबाईलवर बघितले. तेंव्हा त्यांची खात्री झाली की हे फोटो आपल्या मुलीचेचे आहे. हे इंन्स्टाग्राम खाते (आयडी) नारळा येथील शिवाजी सोमासे यानेच तयार केले असल्याचा संशय तरुणीच्या वडिलांना व घरातील आला. लगेचच त्यांनी वैजापूर पोलिस ठाणे गाठत शिवाजी सोमासेसह अज्ञाताविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे करीत आहे.

Post a Comment

0 Comments