वैजापूर पोलिसांत विक्रेत्याविरुद्ध गुन्हा
शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा पोलिसांनी शहरातील स्टेशन रस्त्यावर जप्त केल्याची कारवाई १२ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी ९३ हजारांचा मांजा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: सभापती वाढदिवसात अन् शेतकरी उपोषणात!
विराज संदीप सोनवणे (२० रा.चंद्रपालनगर, स्टेशन रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील स्टेशन रस्त्यावरील रहिवासी असलेल्या विराज सोनवणे याने शासनाने बंदी घातलेला नायलॉन मांजा विक्रीसाठी साठवून ठेवल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली.
हेही वाचा: अन् 'त्याने' पोलिस ठाण्यातच घेतले विष
ही माहिती मिळताच रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने माहितीतील ठिकाण गाठले. त्या ठिकाणी पोलिसांना विराज सोनवणे हा भेटला. पथकाने त्याची विचारपूस केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
हेही वाचा: शेतकऱ्यांना 'तारीख पे तारीख'; दोन कोटींच्या कांद्याचे प्रकरण'
परंतु कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या लक्ष्मी कर्टिग इंटरप्राइजेस या दुकानात नायलॉन मांजा साठवल्याची कबुली दिली. लगेचच पथकाने त्या दुकानातून ९३ हजार ६०० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दीपक औटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विराज सोनवणे याच्याविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.