Vaijapur Taluka Journalists' Association | वैजापूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर

0

अध्यक्षपदी खान, उपाध्यक्ष पाटील व सचिवपदी थोरात 

वैजापूर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मोबीन खान, उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील व सचिवपदी नितीन थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी अमोल राजपूत, फैसल पटेल, मन्सूर अली, राहुल त्रिभुवन, आवेज खान, दीपक बरकसे व विजय गायकवाड.

वैजापूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी मोबीन खान,उपाध्यक्षपदी प्रवीण पाटील व सचिवपदी नितीन थोरात यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.



दर्पण दिनानिमित्त येथील पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.याच कार्यक्रमात वैजापूर तालूका पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.पदाधिकारी निवडीनंतर सत्कार करण्यात आला.बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन चारित्र्यवर पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.


पत्रकार संघाची अन्य  कार्यकारणी अशी :-  सहसचिव - दीपक बरकसे, कोषाध्यक्ष-आवेज खान,सहकोषाध्यक्ष - राहुल त्रिभुवन, जिल्हा प्रतिनिधी - मन्सूर अली यांची निवड करण्यात आली तर सदस्यपदी विजय गायकवाड, फैसल पटेल, अमोल राजपूत, बाबासाहेब धुमाळ, काकासाहेब लव्हाळे, हरिभाऊ साबणे, सुयोग वाणी, निर्घोष त्रिभुवन यांची निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी शहर आणि ग्रामीण परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }