खंडाळाच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन
हृदयाच्या नाजूक कप्प्यात साठवलेल्या आठवणी तब्बल ३२ वर्षानंतर त्याच ठिकाणी, त्याच गड्यांसोबत त्याच वातावरणात उलगडल्या गेल्यातर भावना शब्दांच्याही पलिकडच्या ठरतात. असाच काहीसा अनुभव वर्गामित्रांना आला. आठवणींची स्पंदने तशीच साठवत निरोप घेताना अनेकांना गहीवरून आल. मित्र मिलाप हा आगळा वेगळा उपक्रम वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडला.
हेही वाचा: सेवानिवृत्त ग्रेडरला लाखोंना गंडविले!
सन १९९३-९४ बॅचचे मित्र मैत्रीण तब्बल ३२ वर्षांनी रविवारी (ता.२६) गेट टुगेदर कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आले. इतक्या वर्षांनी सर्वजण एकत्र आल्यावर एक भावनिक वातावरणाचा सोहळा ठरला. खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळा येथे तत्कालीन शिक्षकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पाचवी ते दहावीपर्यंतचे सर्व शिक्षकांची भेट झाल्याने विधार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
हेही वाचा: ते चौघे होते गाढ झोपेत; अंगावर लोखंड पडलं अन् सर्वच संपलं!
बालपण सगळे डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले. जुन्या आठवणींना उजाळा देत जे सध्या हयात नाही त्यांना श्रदांजली वाहण्यात आली.औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.यावेळी विलास त्रिभुवन, अनिल कर्डिले, मोबीन खान, एकनाथ पवार, यांनी मनोगत व्यक्त करताना भूतकाळातील आठवणी ताज्या केल्या.उपस्थित मित्रांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
हेही वाचा: 'त्याने' पोलिसांना गुंगारा देऊन हातकडीसह ठोकली धूम!
दूर -दूर गेलेले सर्वजण एकमेकांना भेटत होते. सेल्फी काढत होते.त्यानंतर सगळ्यांनी धमाल - मस्ती करत हुरडा पार्टी, दाळबट्टी व चमचमीत जेवणावर ताव मारला. या कार्यक्रमाला बाबासाहेब सुदाम, नवनाथ गाडेकर, दिनकर पवार, पूंजाहारी मोरे, राजू बागूल, संतोष झाल्टे, कडू गरूड, कांतीलाल वाघचौरे, दादासाहेब घायवट, भिकन शेख, मिलींद पवार, शिल्पा डवाळकर- कुलकर्णी, वंदना बागूल-सातदिवे,संगिता बागूल- भुजंग आदिंची उपस्थिती होती.
0 Comments