Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

life imprisonment | अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला संपवलं; पतीला जन्मठेपेची शिक्षा, काय आहे प्रकरण बघा!

वैजापूर न्यायालयाचा निर्णय 


 अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील पतीला वैजापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


          आनंद सुरेश लोखंडे (३०, रा. पवननगर, रांजणगाव शेणपुंजी ता. गंगापूर) असे शिक्षा सुनविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद लोखंडे हा सन २०१९ मध्ये पत्नी ममता, मुलगा, मुलगी व आई वडिलासोबत मुकुंदवाडी येथे राहत होता. त्यांच्या लग्नाला आठ वर्षे झाले होते. दरम्यान ०८ जुलै २०१९ रोजी त्याची पत्नी ममता दोन्ही मुलांसह घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेली होती. त्याबाबत आनंद याने मुंकदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद देखील दिली. त्यानंतर आरोपी आनंद यास समजले की, त्याची पत्नी नाशिक रोडवरील रेल्वे स्टेशन परिसरातील राहत असलेला मुलगा  प्रमोद खनपटे (रा. मुकंदवाडी) याच्यासोबत होती. त्यानंतर त्याने पत्नीला सोबत आणले.

हेही वाचा: आमदार रमेश बोरनारे शब्दाला 'जागले'

त्या मुलाचा विसर पडावा म्हणून आरोपी आनंद याने पत्नी ममता, आई, वडील व मुलांसह राजणगाव पवननगर येथे येऊन राहू लागले. तसेच आनंदने  ममताचा मोबाईल काढून घेतला. २० जुलै २०१९ रोजी सकाळी साडेदहा वाजता आनंदची आई ही मुलांना अंगणवाडीत सोडायला गेली तर  वडील वयस्कर असल्याने ते एका जागी बसून होते. नेमके  यावेळी ममता ही पळून गेल्याच्या कारणावरून आनंद व तिच्यात कडाक्याचे भांडण झाले. आनंद याचा राग अनावर झाला व  रागाच्याभरात त्याने ममताला खाली पाडून तिचा गळा दाबून खून केला.  तसेच ती जिवंत राहू नये म्हणून पुन्हा तिचा गळा दाबला. ती मेल्याची खात्री झाल्यानंतर त्याने एम.आय.डी.सी. वाळुज पोलीस ठाण्यात येथे स्वतः जाऊन आपण पत्नीला मारल्याबाबत माहिती दिली.

हेही वाचा: बाजार समितीने दिला ६०-४० चा फाॅर्म्युला

याप्रकरणी एम.आय.डी.सी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करून पोलिस निरीक्षक व्ही.डी. चासकर यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण गंगापूर न्यायालयातून वैजापुर सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले.  

वाचा: सत्यार्थी ई-पेपर

खटल्याच्या सुनावणी दरम्यान साक्षीपुराव्या कामी सरकार पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. यापैकी पाच जणांची साक्ष महत्वाची ठरली. सुनावणीदरम्यान जिल्हा व सत्र न्यायधीश एस. के. उपाध्याय  यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व ३ हजार रूपये दंड, दंड  न भरल्यास ६ महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून दत्तात्रय गवळी यांनी त्यांना सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments