अचानक ब्रेक दाबल्याने घडली घटना
कापडी चादरी विकण्यासाठी परप्रांतात आलेल्या मध्यप्रदेशातील चार तरुणांचा अवजड लोखंडी प्लेटखाली दबून जागीच मृत्यू झाल्याची घटना २७ जानेवारी रोजी रात्री १०: ३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर - मालेगाव महामार्गावरील टुणकी गावाजवळ असलेल्या हॉटेल बळीराजा जवळ घडली. दरम्यान ही घटना धावत्या ट्रकचे अचानक ब्रेक दाबल्याने लोखंडी प्लेट अंगावर कोसळली अन् त्यात चौघांचा मृत्यू झाला.
दिवाण मानसिंग गरासिया(२५) , विजय कवरलाल गरासिया, (वय.२५), विक्रम मदनजी कछवा (वय.२०) तिघेही रा.धरमपुरा ता.मनासा जि.निमज), निर्मल राजुजी गरासिया रा. खडावदा ता. मनासा जि.निमज मध्यप्रदेश अशी या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या चौघांची नावे आहेत.
हेही वाचा: पोलिसांना गुंगारा देत 'तो' हातकडीसह झाला फरार!
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील चौघे मृत व फिर्यादी अनिल पप्पुजी गरासिया (वय.२३ रा. खडावदा) हे काही दिवसांपूर्वी उदरनिर्वाहासाठी तामिळनाडू राज्यात चादर विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी गेले होते दरम्यान त्यांच्याकडील चादरीला ग्राहकांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी आपल्या मध्यप्रदेशातील घरी जाण्याचा निर्णय घेतला.
चहा - नाश्ता करून निघाले
दरम्यान मध्यप्रदेशातील जवळच्या तालुक्यातील एक मालवाहू कंटेनर गावाकडे जात असल्याची माहिती त्यांना मिळाली. यानंतर संबधित कंटेनर वाहनाच्या चालकाशी त्यांनी संपर्क साधला व एक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर गाडी. क्र. आर.जे ०९ जी.डी.३८५३ या वाहनात बसून घरी जाण्यास निघाले.
हेही वाचा: न्यायालयाने केली 'त्या' प्रकरणातून निर्दोष मुक्तता
प्रवासादरम्यान २७ जानेवारी रोजी सायंकाळी समृद्धी महामार्गालगत वाहनचालकासह प्रवासी पाचही जणांनी चहा - नाश्ता करून पुढील प्रवासाला निघाले.
झोप लागली अन् घात झाला!
दरम्यान काही अंतरानंतर विजय, निर्मल,दिवाण,विक्रम यांना झोप येत असल्याने गाडीच्या पाठीमागील भागात झोपण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. याचवेळी चौघेही मध्यरात्रीच्या गाढ झोपेत असतानाच कंटेनर चालकाने वाहन नियंत्रण करण्यासाठी ब्रेक दाबले असता गाडीतील अवजड लोखंडी प्लेट व इतर साहित्य झोपलेल्या चौघांच्या अंगावर पडल्याने या घटनेत दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: सेवानिवृत्त ग्रेडरला लाखोंना गंडविले!
गाडीच्या पाठीमागील भागातून जोराचा आवाज आल्याने वाहनचालकाने ( नाव व पत्ता माहीत नाही) सोबतच्या अनिल यास सोबतच्या कुणास फोन लावून कशाचा आवाज आला याबद्दल विचारणा केली . तदनंतर दोघांनी गाडी थांबवून मागे जाऊन बघितले असता सोबतच्या चौघांच्या अंगावर गाडीतील प्लेट पडलेल्या अवस्थेत असून चौघेही प्लेटखाली दबल्याचे निदर्शनास आले.
मदतीसाठी प्रयत्न!
मात्र गाडीतील साहित्य अवजड असल्याने दोघांना ते बाजूला काढण्यास अशक्य असल्याने त्यांनी मदत मागण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ सुमसान असल्याने मदतीसाठी कुणीही आले नाही. त्यामुळे ड्रायव्हरने काही अंतरावर एक हॉटेल असल्याचे सांगून तिथे आपल्याला त्यांना बाहेर काढण्यास मदत होईल. असे सांगून गाडी पुढच्या दिशेने घेतली. दरम्यान टुणकी जवळील हॉटेल बळीराजा येथे गाडी थांबून हॉटेल चालकास मदतीबद्दल विनंती केली. घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा: परप्रांतीयांचे वाढले 'लोंढे', पोलिस प्रशासन बेखबर
माहिती मिळताच सपोनि वैभव रणखांब हे आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्तांना बाहेर काढून पुढील उपचारासाठी शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी चौघांनाही तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा करून अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनी वैभव रणखांब , पो.उपनिरीक्षक ओगले,किशोर आघडे,विजय भिल्ल, राहुल थोरात करीत आहे.
0 Comments