Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Crime News | 'त्याने' पोलिसांना गुंगारा देऊन हातकडीसह ठोकली धूम; पोलिस दलात खळबळ

 वैजापूर न्यायालयाच्या आवारातील घटना

 


 मकोका गुन्ह्यातील आरोपी येथील न्यायालयात सुनावणीसाठी आणलेला असताना त्याने पोलिसांना चकवा देऊन हातकडीसह ‌धूम ठोकल्याची खळबळजनक घटना वैजापूर येथील न्यायालयात २७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: परप्रांतीयांचे वाढले 'लोंढे'; पोलिस प्रशासन बेखबर

याबाबत अधिक माहिती अशी की, मकोका गुन्ह्यातील मधील आरोपी  शंकर रतन भोसले वय (27) , सागर रतन भोसले (20), शाम बहोट भोसले (26) धीरज भारम भोसले वय (20), अजय काळे (22) , रावसाहेब भीमराव पगारे ( 35),  पाडुरंग भोसले वय (36) परमेश्वर दिलीप काळे (20), अमित उर्फ अमिनखान भोसले (22) सर्व रा. पडेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर सर्वांनाइ हातकडी व बागडोरने व्यवस्थित बांधून ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने (क्रमांक MH 12 WP 9406) वैजापूर येथील सत्र न्यायालयात वैजापुर दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास आले. 

हेही वाचा: सेवानिवृत्त ग्रेडरला लाखोंना गंडविले!

त्यानंतर सर्व आरोपींना दुपारी 12.45 ते 1.30 पर्यंत न्यायालय समक्ष हजर करून त्यांना योग्य पोलिस बंदोबस्तात शासकीय वाहनामध्ये बसवून अन्य आरोपींची वाट पाहत गाडीमध्ये बसले होते. 

हेही वाचा: अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला संपवलं!

त्याचवेळी काही पोलिस आणखी काही आरोपींना लघुशंका करून आणून त्यांना वाहनात बसवित असताना 03.30 वाजेच्या सुमारास धीरज भारम भोसले वय 20 वर्षे रा. रा. पड़ेगाव ता. कोपरगाव जि. अहमदनगर हा हातकडीसह शासकीय वाहनाच्या मागच्या दरवाजाने पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments