Accident | 'ती' शिकविणीसाठी जात होती; वाहनाने धडक दिली अन् क्षणार्धात सर्व काही संपलं!

0

वैजापूर शहरातील म्हसोबा चौकातील घटना 

 

भरधाव जाणाऱ्या पिकअपच्या धडकेत शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची घटना ०८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर - नाशिक महामार्गावरील म्हसोबा चौकात घडली. दरम्यान अपघात झाल्यानंतर  तिला रुग्णालयात दाखल केले होते. परंतु तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.


हेही पाहा - पालिकेचा कारभार 'अंधेर नगरी, चौपट राजा'


 श्रेया हरिश्चंद्र दुसाने (१५ रा. आनंदनगर) असे घटनेतील मृत मुलीचे नाव आहे. श्रेयाच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, श्रेया दुसाने ही वैजापूर येथील आनंदनगर परिसरात कुटूंबियांसह रहिवासास होती. ती शहरातील सेंट मोनिका शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती.


हेही वाचा - शेतीच्या वादातून तरुणाचा खून


 दरम्यान बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ती सायकलवरून शिकवणीला जात होती. घरून निघाल्यानंतर ती म्हसोबा चौकात पोहोचली. त्या ठिकाणी रस्ता ओलांडताना छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने शहरात येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने तिला जोराची धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली. त्याच अवस्थेत तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }