वैजापूर पंचायत समितीतील घटना
वैजापूर येथील पंचायत समिती कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याचे वारंवार छायाचित्र काढून तिचा विनयभंग करणाऱ्या दोघांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात २८ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
दतात्रय माधवराव मोटे (रा. गोयगाव) व सचिन कुशीनाथ मोईन (रा.चोरवाघलगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित महिला ही येथील पंचायत समिती कार्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. २१ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ती नेहमीप्रमाणे पंचायत समिती कार्यालयात कर्तव्यावर असताना त्या ठिकाणी दत्तात्रय मोटे हा आला व त्याने काही एक काम नसतांना पीडित महिलेचा फोटो काढला. यावर महिला कर्मचाऱ्याने त्याला जाब विचारला असता 'तुमचा फोटोशी काही एक संबंध नाही' असे म्हणून तो निघून गेला.
हेही वाचा: लग्नाची तयारी झाली.. घटिकाही समीप आली.. तोच पोहोचला पोलिसांचा ताफा!
२२ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दतात्रय मोटे व सचिन मोईन हे दोघे आले व पीडित महिलेचा फोटो काढून कार्यालयाबाहेर बसून गप्पा मारू लागले. त्यानंतर देखील २३ व २४ जानेवारी रोजी पुन्हा ते कार्यालयात आले व दत्तात्रय मोटे याने पीडितेचा फोटो काढला. याशिवाय वारंवार कार्यालयात येऊन त्या दोघांनी पीडित महिला कर्मचाऱ्याच्या कामात अटकाव केला. याबाबत पीडितेने कार्यालायातील सहकारी महिला कर्मचाऱ्यांना माहिती दिली.
हेही वाचा: 'ते' चौघे होते गाढ झोपेत; अंगावर लोखंड पडलं अन् सर्वच संपलं!
२७ जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता दतात्रय मोटे व सचिन मोईन हे पुन्हा आले व त्यांनी पीडितेचा फोटो काढला. यावर तिने 'तुम्ही माझा वारंवार फोटो का काढता ?' असा प्रश्न त्यांना केला. त्यावर मोटे याने सांगितले की, 'मी फोटो काढतो तुम्हाला काय त्रास होतो ? तुम्हाला काय करायचे ते करुन घ्या तुम्हाला काही त्रास होत असेल तर तुम्ही माझ्यासोबत पोलिस स्टेशनला या' असे म्हणून निघून गेले.
हेही वाचा: 'ते' ३२ वर्षांनंतर आले एकत्र अन् रमले आठवणींच्या प्रांतात!
'तेथे'ही केला पाठलाग!
त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पीडिता कार्यालयाच्या बाजूला स्वच्छतागृहात जात असताना मोटे व मोईन या दोघांनी पीडितेचा पाठलाग करून तिचा व्हिडीओ काढून पीडितेला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याच दिवशी पुन्हा सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते दोघे परत आले व त्यांनी पीडितेचा फोटो काढला.
हेही वाचा: 'त्याने' पोलिसांना गुंगारा देऊन हातकडीसह ठोकली धूम!
तेव्हा ती त्यांना म्हणाली की, 'तुम्ही माझा वारंवार फोटो का काढतात. माझ्याकडून तुम्हाला काही त्रास आहे काय ?' तेव्हा मोटे म्हणाला की, 'मी रोज येईल तुम्हाला काय करायचे ते करून घ्या. तुम्ही जर विरोध केला तर तुम्हाला बघून घेईल. असा दम देत तुम्हाला जर जमत नसेल तर राजीनामा देऊन टाका' असे म्हणून धमकी दिली.
0 Comments