Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

leopard attack | हृदयद्रावक: 'तो' चिमुकला शेतात खेळत होता; बिबट्याने हल्ला केला अन् होत्याचं नव्हतं झालं!

 

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू


 शेताच्या बांधावर खेळत असलेल्या परप्रांतीय मजुराच्या ९ वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजेच्या सुमारास घडली. गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना असून वनविभागाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. 



महेश सिद्धार्थ आखाडे असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कविटखेडा परिसरातील गोरख काशिनाथ चव्हाण यांच्या गट नंबर १३३ शेतामध्ये मध्यप्रदेशमधील परप्रांतीय मजूर कापूस वेचित असताना त्याचा मुलगा  महेश आखाडे हा शेताच्या बांधावर खेळत होता. त्याचवेळी बाजूच्या ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला चढवत ज्वारीच्या शेतात फरफटत नेले. 


मुलाच्या ओरडण्याच्या आवाजाने कापूस वाचणारे मजूर मुलाला वाचविण्यासाठी धावले. शेजारी शेतात ट्रॅक्टरने काम सुरू होते. चालकाने तात्काळ ज्वारीच्या शेतात मुलाला वाचविण्यासाठी ट्रॅक्टर घातला.  ट्रॅक्टरच्या बघितल्याने बिबट्याने पळ काढला. मात्र तोपर्यंत बिबट्याने मुलास गंभीर जखमी केल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. 


महिन्याभरात लहान मुलांवर बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केला असून काही दिवसांपूर्वी तलवाडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलीचा मृत्यू झाला होता. याशिवाय वैजापूर तालुक्यातील नागमठाण परिसरात ही एका वृद्धेवर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याला पकडण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments