Eknath Shinde | लाडक्या बहिणींच्या 'सावत्र' भावांना जागा दाखवा; का म्हणाले मुख्यमंत्री बघा.!

0

वैजापूर येथील प्रचारसभेत आवाहन 


 राज्यातील महायुतीच्या सरकारने सव्वादोन वर्षात जनतेसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. हे सामान्यांचे व तुमचं सरकार आहे. सरकारने सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' ( Chief minister Mazhi Ladki Bahin Yojana) सुपरहिट ठरली आहे. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठून ते योजना बंद करायला न्यायालयात गेले. परंतु न्यायालयाने त्यांच्या मुस्कटात मारली. त्यामुळे अशा 'सावत्र' भावांना या विधानसभा निवडणुकीतून हद्दपार करा. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief minister Eknath Shinde) यांनी वैजापूर येथे केले.



शिवसेना महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे MLA Ramesh Bornare) यांच्या प्रचारार्थ शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या ( मुलांची) मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार संदीपान भुरे, आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, अभय पाटील चिकटगावकर, बाजार समितीचे माजी सभापती संजय निकम, भागिनाथ मगर, डॉ. राजीव डोंगरे, साबेरखान, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, अमोल बोरनारे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 


मुख्यमंत्री शिंदे सुरवातीलाच म्हणाले की, मी देणारा मुख्यमंत्री आहे. घेणारा नाही. अगोदरच्या अडिच वर्षांत आणि नंतर सव्वादोन वर्षांच्या काळात काय केले? याबाबत जनता दरबार भरवा. आम्ही समोरासमोर बोलायला तयार आहे. अगोदरचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर काय झाले असते. याची कल्पनाच न केलेली बरी. 'लाडकी बहिण योजना' योजना बंद करण्यासाठी दृष्ट सावत्र भावांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पण न्यायालयाने त्यांना चपराक बसविली. त्यामुळे त्यांची 'डाळ' शिजली नाही. गरीबांसाठी सिलिंडर, मोफत शिक्षण अशा विविध योजना सुरू करून कल्याणकारी निर्णय घेतले. सध्यस्थितीत राज्यातील ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्त्यांची कामे सुरू आहेत. वैजापूर तालुक्यातील ६८ हजार बहिणींना योजनेचा लाभ होतोय. येत्या काही दिवसांत ही रक्कम वाढविली जाईल. मला बहिणींना 'लखपती' झालेले बघायचे आहे. असे सांगून आम्ही विश्वासघात केल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. 


परंतु एकंदरीत जे काही चालू होते. ते खपवून घेण्यासारखे नव्हते. म्हणूनच उठाव करण्याची वेळ आली. परिणामी गेल्या सव्वादोन वर्षात आम्हाला जनतेला भरभरून देता आले. जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून आमदार रमेश बोरनारे माझ्यासोबत खंबीरपणे उभे आहेत. त्यांनी कुठे जायचे मला विचारले नव्हते. त्यांची मला मोलाची साथ मिळाली असे सांगून या निवडणुकीत महायुती सरकारला पुन्हा संधी देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्या. असे आवाहन शिंदे यांनी केले. आमदार रमेश बोरनारे यांनी प्रारंभी मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन साखर कारखान्यासह बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी सुरू असलेली वाॅटरग्रीड योजना, रस्ते व सिंचनाचे बहुतांश प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केला. यासाठी मला मुख्यमंत्र्यांनी मोठी साथ दिली.  त्यांच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नव्हते. यानंतर मी जनसेवेसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बोरनारे माझे 'फेवरेट' आमदार 


वैजापूरचे रमेश बोरनारे हे माझे फेवरेट आमदार आहेत. राज्यात सुरु असलेल्या ४५ हजार गावांतील पाणंद रस्त्यांची कल्पना त्यांनीच सुचविली होती. मतदारसंघासाठी त्यांनी ३००० कोटी रुपयांचा निधी खेचून विकासकामे केली. असा धडाडीचा, हवाहवासा आमदार तुम्ही निवडून दिला. याचा मला सार्थ अभिमान आहे. बोरनारे आदर्श आमदार असून यावेळीही मला त्यांच्या विजयाची खात्री आहे. परंतु यावेळी रेकाॅर्ड झाले पाहिजे.असेही ते म्हणाले.


धनुष्यबाण उचलायला ताकद लागते 


आमचे सरकार आल्यानंतर माझ्यासह अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी विरोधकांनी दिली. परंतु मला जेलमध्ये टाकण्याची धम्मक तुमच्यात आहे का? तेच मी बघतो. धनुष्यबाण उचलायला ताकद लागते. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.


राज्यात २५ लाख रोजगार निर्मिती 


राज्यात २५ लाख रोजगार निर्मिती करून अक्षय व सौरऊर्जा प्रकल्पांवर भर देण्यात येणार आहे. याशिवाय वैजापूर तालुक्यातील चांदेश्वरी प्रकल्पासह औद्योगिक वसाहत, सिंचन प्रकल्पांचे प्रलंबित कामे लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. असेही ते म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top