Dr. Dinesh Pardeshi | हाय व्होल्टेज ड्रामा: भाजप नेत्याच्या प्रवेशाचे 'गूढ' वाढले.!

0

शहरात अफवांचे पेव,राजकारणात ट्विस्ट 


भाजप नेत्याच्या (BJP leader) ठाकरेसेनेतील प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात (Vaijapur ) अफवांचे पेव फुटत असल्याने राजकारणात (politics ) ट्विस्ट निर्माण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाजप नेता 'नाॅट रिचेबल' ( Not Reachable ) असल्याने या प्रवेशाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  या नेत्याच्या प्रवेशाची खुलेआमपणे चर्चा सुरू असली तरी या 'उघड' गुपितामुळे 'गूढ' वाढत चालले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर 'हाय व्होल्टेज ड्रामा' (High Voltage Drama) बघावयास मिळत असून शहरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 


  गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी Dr Dinesh Pardeshi) यांच्या ठाकरेसेनेतील (UBT Shivsena) प्रवेशाची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे. एवढेच नव्हे तर १५ सप्टेंबर रोजी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (UBT leader Udhav Thackeray ) यांच्या उपस्थितीत डॉ. परदेशींचा प्रवेश करून 'राज्याभिषेक' होणार असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर ( मुलांची) भव्य मंडप टाकण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संवाद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वैजापूर शहरातील मुख्य चौकासह रस्त्यावर दुतर्फा डिजिटल फलकही (Digital Banners) झळकले आहेत. तसेच सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) झालेल्या डिजिटल फलकावरही डॉ. परदेशींचे छायाचित्रे झळकली आहेत. 



परंतु १३ सप्टेंबरपासून डाॅ. परदेशींच्या प्रवेशाबाबत चर्चेला अचानक कलाटणी मिळाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. डाॅ. परदेशींच्या प्रवेशाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून (BJP's Leader) त्यांच्यावर दबावतंत्राचा वापर केला जात असून त्यामुळे त्यांच्या प्रवेशासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असल्याचेही ठाकरसेनेतील  काही पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. दुसरीकडे डॉ. परदेशींचा ठाकरेसेनेत प्रवेश निश्चित आहे. असेही त्यांनी ठणकावून सांगितले. परंतु असे असले तरी दस्तूरखुद्द डॉ. परदेशी हे अजूनही माध्यमांसमोर यायला तयार नाही. किंबहुना याबाबत त्यांनी याबाबत आपली भूमिका कुठेही स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे या प्रवेशाबाबत गूढ वाढत चालले आहे. डॉ. परदेशींची भूमिका स्पष्ट होत नसल्याने याबाबत वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहे.


आज 'गूढ' उकलणार?

वरिष्ठ भाजप नेत्यांच्या दबावतंत्रामुळे डॉ. परदेशींचा प्रवेश लांबणीवरही पडू शकतो. त्यांनी कुणाचेच ऐकले नाही तर तर आज ठाकरेंच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमातील व्यासपीठावर अचानक अवतरून ते 'सरप्राईजही' देऊ शकतात. अशी वेगवेगळी मतमतांतरे ऐकावयास मिळत आहे. दुसरीकडे या प्रवेशाला 'खो' देखील बसू शकतो. असेही तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु हा प्रवेश आजच होईल. असे कुणीही ठामपणे सांगायला तयार नाही. डाॅ. परदेशींच्या प्रवेशाची तालुक्यात उघड चर्चा असली तरी ठाकरेसेनील प्रमुख पदाधिकारी उघड बोलायला तयार नाही.  त्यामुळे डॉ. परदेशींचा ठाकरेसेनेत प्रवेश होणार का ॽ भाजपच्या दबावतंत्रामुळे ते थांबणार का? तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश पुढे ढकलणार की, ते आज अचानक व्यासपीठावर येऊन 'सरप्राईज' देणार? हे  'गूढ' मात्र आज उकलणार आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top