Motion of No Confidence | माजी खासदारांच्या सूनबाईंचे स्वप्न भंगले; सरपंचाविरुध्दचा अविश्वास ठराव बारगळला.!

0

 दहेगाव - राहेगव्हाण ग्रुप - ग्रामपंचायत 


वैजापूर तालुक्यातील दहेगाव - राहेगव्हाण या  ग्रुप - ग्रामपंचायतीच्या सरपंचविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तीन चतुर्थांश बहुमताअभावी बारगळला. माजी खासदार स्व. रामकृष्ण पाटील यांच्या सूनबाई सुहासिनी पाटील यांनी सरपंच मोहन मार्तंड उगले यांच्याविरुद्ध हा अविश्वास ठराव दाखल केला होता.  



       माजी खासदार स्व. रामकृष्णबाबा पाटील यांच्या सूनबाई तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील यांच्या पत्नी सुहासिनी पाटील यांच्यासह मीना ज्ञानेश्वर उगले, वंदना चंद्रकांत उगले व समाधान एकनाथ उगले यांनी तहसीलदारांकडे विविध कारणांमुळे सरपंच मोहन उगले यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर १२ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विद्यमान सरपंचासह एकूण ८ सदस्य हजर होते.  


सुहासिनी पाटील यांच्यासह मीना ज्ञानेश्वर उगले, वंदना चंद्रकांत उगले व समाधान त्रिभुवन यांनी विविध पाच कारणांमुळे आणलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उंचावून मतदान केले तर सरपंच मोहन उगले, उपसरपंच मीराबाई बाळासाहेब बुट्टे, किशोर रमेश पंडित व सोमीनाथ बाबुलाल सोनवणे या सर्वांनी अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान केले. दरम्यान अविश्वास ठरावासाठी हवे असलेले तीन चतुर्थांश बहुमत सिद्ध न झाल्याने हा अविश्वास ठराव बारगळला. निवडणूक निर्णयधिकारी म्हणून तहसीलदार सुनील सावंत यांनी कामकाज बघितले. यावेळी सरपंच मोहन मार्तंड यांनी उपस्थितांचे आभार मानले.


अशी होती अविश्वासाची कारणे

सरपंच आपल्या  गैरवापर करतात, सरपंच कार्यालयात हजर राहत नाही, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही, ग्रामपंचायतीत आलेला विकास कामाचा निधी आलेला असताना सुद्धा विकास कामे करत नाही व मासिक सभा देखील घेत नाही. या पाच मुद्द्यांवर सदस्य सुहासिनी पाटील व अन्य सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top