Teasing | 'तो' तिचा पाठलाग करायचा अन् मग 'तिने'ही त्याच्या 'श्रीमुखात' भडकावली!

0

मुलीची छेड; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 


दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 


 अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या दोघांंविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



          भरत अशोक साठे व संदीप अरुण लोखंडे (दोघे रा. फुलेवाडी रोड, वैजापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील सोळा वर्षीय पीडित मुलगी ही वैजापूर शहरातीलच एका शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान मुलगी शाळेत जात असताना मागील दोन -तीन महिन्यांंपासून भरत साठे हा तिचा पाठलाग करीत होता. याबाबत मुलीने तिच्या आईवडिलांना देखील सांगितले. त्यानंतर  तिच्या आईवडिलांनी संदीपच्या घरी जाऊन त्याला समज दिली. 


परंतु ०९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मुलगी पायी जात असताना भरत व त्याचा मित्र संदीप हे दोघे त्या ठिकाणी आले. 'तू जर माझ्याबद्दल तुझ्या आईवडिलांना सांगितले तर तुला भर चौकातून गायब करून टाकेल' अशी धमकी भरतने पीडितेला दिली. त्याने असे म्हणताच मुलीने भरत याच्या श्रीमुखात भडकावली. हा सर्व प्रकार सुरू असताना त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. यामुळे त्या दोघांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून  वैजापूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्यासह विनयभंग व अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top