Vaijapur Assembly Constituency | वैजापूर विधानसभा मतदारसंघावर ठोकला दावा.. महायुतीच्या 'फियास्को'चीही केली भविष्यवाणी.! का म्हणाले भाजप नेते बघा !

0

एकनाथ जाधव यांची माहिती 


विधानसभा निवडणूक (Assembly Election) होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वैजापूर विधानसभा मतदारसंघाची जागा भारतीय जनता पक्षाच्या (BJP's Candidate) उमेवाराला सोडवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे यदाकदाचित महायुती तुटली तर पक्ष स्वबळावर निवडणूक लढवून भाजप उमेदवाराला निवडणूक आखाड्यात उतरण्याची संधी मिळेल. असे सुतोवाच करून स्थानिक पातळीवर पक्षाला कोणताही धोका नसून कुणीही पक्ष सोडून जाणार नाही. असे स्पष्टीकरण भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव (Eknath Jadhav) यांनी दिले. दरम्यान विधानसभा मतदारसंघावर भाजप नेत्याने दावा ठोकल्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय 'आखाडा' पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.


एकनाथ जाधव, भाजप नेते 

 वैजापूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जाधव म्हणाले की, नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे भाजप पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात जनसंवाद यात्रा काढण्यात येणार असून २५ दिवस ही यात्रा सुरू राहील. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वैजापूर मतदारसंघाची जागा आम्ही भाजप उमेदवारास सोडवून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. गेल्या पाच वर्षांत मित्रपक्षातील आमदारांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला.


 यांशिवाय वैजापूरच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले नसले तरी पक्ष सोडून कुणीच जात नाही. परंतु ऐकिवात आलेल्या चर्चेमुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आम्ही पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यात त्यांचे समुपदेशन करण्यात आले. यानंतरही पक्ष सोडून कुणी जाणार असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. तसेच पक्षात येणाऱ्यांसाठी आमची दारे नेहमीच उघडी आहेत. सन २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेसह भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे राजकारणात कधी काहीही होऊ शकते असे गृहीत धरून मी तयारीला लागलो आहे. यदाकदाचित महायुती तुटली तर भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकते. यात उमेदवारीसाठी लाॅटरी लागू शकते. मी निवडणूक लढविणारच आहे. भाजपला जागा न सोडल्यास ऐनवेळी वेगळा विचार होऊ शकतो. परंतु याबाबत आज स्पष्ट बोलणे उचित होणार नाही. 


जाधवांचा सावध पवित्रा !

भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी (Dr Dinesh Pardeshi) हे पक्षाशी काडीमोड घेत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. या प्रश्नावर थेट बोलण्याचे त्यांनी मात्र टाळले. असे काही झाले. याबाबत मला माहित नसल्याचे त्यांनी  सांगितले. परंतु काहीतरी घडतंय. हे समजल्यानंतर आम्ही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. हे मात्र सांगायला ते विसरले नाहीत. त्यांच्या बोलण्यातील विसंगती व सावध पवित्रा बऱ्याच काही गोष्टी सांगून गेल्या.


राजकीय 'आखाडा' पुन्हा रंगणार.!

ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (Former MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar) यांनी पक्षाशी घेतलेला 'काडीमोड'. त्यापाठोपाठ भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशींच्या भाजपला रामराम ठोकण्याच्या चर्चेमुळे वैजापूर तालुक्याचे राजकारण (Politics) ढवळून निघालेले असतानाच भाजप नेते जाधवांनी विधानसभा मतदारसंघावर ठोकलेला दावा राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारा ठरला आहे. यामुळे राजकीय आखाडा पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top