१५ हजार रुपये हस्तगत
पाच महिन्यापूर्वी वैजापूर बसस्थानकात तालुक्यातील सवंदगाव येथील रावसाहेब बाळा म्हस्के यांच्या खिशातून १८ हजार ५०० रुपयांची रक्कम चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वैजापूर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी उघड करण्यात वैजापूर पोलिसांना यश आले असून त्यांनी शनिवारी एका महिलेला ताब्यात घेतले असून तिने या चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शोभा चंदन राखुडे उर्फ राखपसरे (५० रा. नारायणवाडी ता. चाळीसगाव जि. जळगाव ) असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडुन चोरी झालेल्या अठरा हजार ५०० रुपयांपैकी १४ हजार ५०० रुपये जप्त केले आहे.या घटनेची अधिक माहिती अशी कि, वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथील रावसाहेब म्हस्के यांच्या खिशातुन बसस्थानकात १८ हजार ५०० रुपये चोरीस गेले होते.
१७ ऑगस्ट रोजी वैजापूर ठाणेप्रमुख श्यामसुंदर कौठाळे यांना माहिती मिळाली की, वैजापूर बसस्थानकात एक महिला संशयितरित्या गर्दीमध्ये फिरत आहे. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रगटीकरण शाखेचे योगेश झाल्टे, महिला पोलिस सुरवसे, आगवान यांच्या पथकाने संशयित महिलेला पकडून ठाण्यात आणले व तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने चार पाच महिन्यांपुर्वी वैजापूर बसस्थानकात रोख रक्कम चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली.
छाया स्त्रोत - गुगल