Subsidy | 'या' शेतकऱ्यांना मिळणार २५ कोटींचे अनुदान; हेक्टरी पाच हजार रुपये

0

कापूस, सोयाबीन उत्पादकांना दिलासा 


 गतवर्षीच्या खरिप हंगामातील वैजापूर तालुक्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक ८८ हजार १३९ शेतकऱ्यांना  महाराष्ट्र शासनाकडून जवळपास २५ कोटी रुपयांचे सहानुग्रह अनुदान मिळणार आहे. अनुदानाची रक्कम हेक्टरी ५ हजार रुपये राहणार असून याची कमाल मर्यादा  दोन हेक्टरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र,सहमती पत्र व  आधार कार्ड देणे आवश्यक आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी दिली आहे.



         सन २०२३-२४ खरीप हंगामात सोयाबीन व कापसाला बाजारपेठेत कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्या नुकसानीचा मोबदला म्हणून राज्य शासनाकडून कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान मिळणार असून अनुदानाची कमाल मर्यादा ही दोन हेक्टरपर्यँत निश्चित करण्यात आली आहे. पीक पाहणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांनाच अनुदानाची रक्कम मिळणार आहे. दरम्यान ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या या पुणे येथील जमावबंदी आयुक्त यांच्याकडून कृषी आयुक्त (पुणे) यांना प्राप्त झाल्या आहेत. या याद्या प्रत्येक गावांमध्ये कृषी सहायकांंमार्फत ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याचे काम करण्यात आले आहे. यादीत नाव प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांसह कृषी सहयकांशी संपर्क करावा. दरम्यान ई - पीक ‌पाहणी करूनही यादीत नाव न आलेल्या  शेतकऱ्यांनी ई-पीक पाणी केल्याचा पुराव्यासह  तहसी‌लदारांंकडे अर्ज करावा. असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


 ८८ हजार १३९ शेतकऱ्यांना अनुदान

वैजापूर तालुक्यात एकूण ई - पीक पाहणी केलेले कापूस उत्पादक संयुक्त खातेदार १४ हजार ७५० तर वैयक्तिक ५५ हजार ५८५ खातेदार आहेत. याशिवाय संयुक्त सोयाबीन उत्पादक ३ हजार ४६८ व वैयक्तीक १४ हजार ३६६ सोयाबीन उत्पादक खातेदार आहेत. हे सर्व शेतकरी मिळून एकूण ८८ हजार १३९  शेतकऱ्यांना अंदाजे 25 कोटी अर्थसहाय मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सहायक याना तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र व संमती पत्र जोडून द्यावे.

- व्यंकट  ठक्के, तालुका कृषी अधिकारी, वैजापूर

छाया स्त्रोत - गुगल 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top