Tree Planting | माझी वसुंधरा अभियान: वैजापूर पालिका हजारो झाडे लावणार

0

वृक्षलागवडीस सुरवात 


वैजापूर  नगर परिषद क्षेत्रात 'माझी वसुंधरा अभियानांतर्गत' गेल्या चार वर्षांत सुमारे ८० हजार झाडांची लागवड व संवर्धन करण्यात आले. याच अभियानाचा पुढील टप्पा म्हणून ७ आॅगस्ट रोजी या वर्षात वीस हजार वृक्षलागवडीचा संकल्प करून मोहिमेस सुरवात करण्यात आली.


वैजापूर नगरपालिकेच्या वतीने यंदा शहरात २० हजार वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला. या मोहिमेची सुरवात करण्यात आली.

वैजापूर शहरातील अजिंठा पार्क येथील खुल्या जागेत सुमारे ६०० झाडांचे घनवन तयार करण्यात आले आहे. नगर परिषदेने माझी वसुंधरा अभियानांतर्गत या खुल्या जागेत तारेचे कुंपण करून वृक्ष लागवड केलेली असून पाण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. यापूर्वी नगरपालिकेने शहरातील विविध ३८ ठिकाणी घनवन तयार केलेले‌ असून हे घनवन अत्यंत हिरवगार झाले आहे.पर्यावरणीय बदलाचा परिणाम पृथ्वीवर होत असल्याने सतत जास्त तापमान,अचानक जास्त पाऊस यासारखे प्रकार घडत आहेत तर वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलनास मदत करून जबाबदारी पार पाडावी. या उद्देशाने शहरातील नगरपरिषद शाळेतील विद्यार्थी, स्थानिक रहिवासी ,पदाधिकारी, तहसीलदार या सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहिमेस सुरवात करण्यात आली. 


नगरपरिषदेमार्फत यापुढील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास माननीय जिल्हाधिकारी महोदय सुद्धा उपस्थित राहणार आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगवा व  सामाजिक व पर्यावरणीय भान राखून आपली जबाबदारी पार पाडावी. असे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले. यावेळी वैजापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, माजी उपनगराध्यक्ष साबेर खान, तहसीलदार सुनील सावंत, प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत, सुरेश चिमटे,विष्णू अलुले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top