Ramgiri Maharaj | 'हिंदू हुंकार मोर्चा'ने शहर दणाणले, 'त्या' घटनेचा निषेध !

0

 वैजापुरात जंबो पोलिस बंदोबस्त 


 बांगलादेशातील हिंदूसह सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ येथील हिंदू बांधवांच्यावतीने शहरातून 'हिंदू हुंकार मोर्चा' काढण्यात आला. या भव्य मोर्चामुळे छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गासह गंगापूर रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. याशिवाय मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


वैजापूर येथे आयोजित 'हिंदू हुंकार मोर्चा'त अशी गर्दी होती.


 बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या, महिला, मुलींवरील अमानुष अत्याचार व हिंदू धर्मस्थळावर होत असलेले हल्ले तसेच सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ हिंदू समाज बांधवांच्यावतीने २९ ऑगस्ट रोजी हिंदू हुंकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यापासून मोर्चास सुरवात होऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व त्यानंतर थेट तहसील कार्यालय जाऊन मोर्चा धडकला. 



तेथे पाठीमागील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या ठिकाणी प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. सभेत बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार थांबवून रामगिरी महाराजांविरुध्द दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात आमदार रमेश बोरनारे, एकनाथ जाधव, बाबासाहेब जगताप, रणजित चव्हाण आदींसह तरुण, वयोवृद्ध, भजनी मंडळ, महिला व नागरिक मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.


 दरम्यान या पार्श्वभूमीवर ‌तगडा पोलिस बंदोबस्त असल्याने शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त  झाले होते. मोर्चाच्या अनुषंगाने  पोलिस प्रशासनाने एक दिवस अगोदरच शहरातील मोक्याच्या ठिकाणी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. गुरुवारी सकाळपासून बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद होती. दुपारनंतर बाजारपेठ पूर्ववत सुरू झाली.


'वुई सपोर्ट' रामगिरी महाराज 

दरम्यान या मोर्चात सहभागी झालेल्यांनी भगवे कपडे परिधान करून हातात 'वुई सपोर्ट रामगिरी महाराज' असे फलक घेतलेले होते. मोर्चादरम्यान मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top