वैजापूरचा लाॅंड्रीचालक करतो मोफत सेवा
देशाचा राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंग्याची सेवा ज्यांच्या हातून होते. त्याचा सेवा करणाऱ्यालाही सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळे ते स्वतःला भाग्यवान समजतात. येथील इस्ञी दुकानचालक गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रध्वज मोफत धुवून व इस्ञी करून देत आहे. संतोष निकम असे या दुकानचालकाचे नाव आहे.
लाॅंड्रीचालक संतोष निकम |
शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात संतोष निकम यांचे इस्ञीचे दुकान आहे. साधारणतः सन १९९५ पासून ते या व्यवसायात आहेत. त्यांचे वडीलही हाच व्यवसाय करीत होते. याच परिसरात नगरपालिकेचे श्री स्वामी समर्थ विद्यालय आहे. प्रजासत्ताक दिनासह महाराष्ट्रदिन, स्वातंञ्यदिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त या शाळेत ध्वजारोहण करण्यात येते. तत्पूर्वी शाळेकडून राष्ट्रध्वज धुवून इस्ञी करण्यासाठी निकम यांच्या दुकानात दिला जातो. ते राष्ट्रध्वज धुवून ( ड्रायक्लिन) व इस्ञी करून शाळेकडे सुपूर्द करतात. गेल्या ३० वर्षांपासून त्यांचे मोफत अविरत कार्य सुरू आहे.
जेवढी जबाबदारी ध्वजारोहण करतांना शाळेतील शिक्षकांची असते. तेवढीच जबाबदारी ध्वजाची स्वच्छता करतांना असते. तो धुताना अथवा इस्ञी करतांना फाटला जाऊ नये. याची काळजी घेणे. तितकेच जोखमीचे काम आहे. परंतु निकम हे काम इमानेइतबारे व जबाबदारीने पेलून नेतात. त्यांच्यापूर्वी त्यांचे वडीलही हेच काम करीत होते. श्री स्वामी समर्थ विद्यालयाची स्थापना सन १९९० मध्ये झाली. त्यानंतर साधारणतः पाच वर्षे या शाळेत फडकविण्यात येणाऱ्या ध्वजाची इस्ञी तेच करीत होते. त्यांच्यानंतर ही जबाबदारी मुलगा संतोष निकम यांच्याकडे आली. त्यांनी राष्ट्रध्वजाची निगा राखण्याचे आता त्यांचे ३० वे वर्ष आहे. यापुढेही ध्वजाची निगा राखण्याचे काम अविरत सुरू ठेवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या ३० वर्षांपासून श्री. स्वामी समर्थ विद्यालयात फडकविण्यात येणाऱ्या ध्वजाची मी धुवून इस्ञी करण्याचे काम मोफत करीत आहेत. माझ्यापूर्वी हे काम वडील करायचे. राष्ट्रध्वजाची सेवा करण्याची संधी मला मिळणे. हा माझ्यासाठी सर्वात मोठा गौरव समजतो. देशाभिमान सर्वांनाच असतो. तसा मला आहे. त्यामुळे देशकार्यासाठी आपला काही प्रमाणात का होईना हातभार लागतो. याचे समाधान नक्कीच आहे.
- संतोष निकम, लाँड्रीचालक, वैजापूर