Ramgiri Maharaj | दाखल गुन्हे रद्द करा अन्यथा आंदोलन तीव्र करणार; महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलन

0

 महालगावात शासनाला दिले निवेदन 


 सराला बेटाचे मठाधिपती  रामगिरी महाराजांविरुध्द राज्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे तात्काळ रद्द करून यापुढे गुन्हे दाखल करु नये. या मागणीसाठी वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे समर्थनार्थ   मोर्चा काढण्यात आला होता. दाखल झालेले गुन्हे रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.


वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे आंदोलन केल्यानंतर निवेदन देण्यात आले.

 पांचाळे ता. सिन्नर येथे गंगागिरी महाराज अंखड हरिनाम सप्ताहच्या प्रवचनामध्ये विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप रामगिरी महाराजांवर करण्यात आलेला आहे. एखाद्या समाजामध्ये किंवा धर्मामध्ये पूर्वीच्या काळात काही चुकीच्या  घटना घडलेल्या असेल व त्या सर्व समाजाच्या मनावर विपरीत  परिणाम करणार्‍या असतील तर साधुसंत त्याबद्दल आपले मत जाहीरपणे मांडू शकतात. म्हणून रामगिरी महाराजांनी मांडलेल्या मुद्द्याचा समजातील काही घटकांनी चुकीचा अर्थ लावून महाराजांवर राज्यात  अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे व यापुढे पुन्हा गुन्हे दाखल होऊ नये. तसेच जे गुन्हे दाखल झालेले आहेत. 


ते शासनाने तात्काळ रद्द करावे. असे शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हणटले आहे. आंदोलनास सकाळी ११ वाजता येथील श्रीराम मंदिरापासून टाळ,मृदुंग वाजत सुरवात करून गांवातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सांगता करण्यात आली. यावेळी महालगावसह पानवी, वक्ती, सिरजगाव, बाजाठाण, भगूर, नागमठाण, काटेपिंपळगाव, माळीघोगरगाव, एकोडीसागज, शनिदेवगाव, चेंडूफळ परिसरातील साधुसंतासह भाविकभक्त , ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top