Maharashtra Police | 'त्याने' पोलिसालाच केली धक्काबुक्की; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0

जरुळ येथील घटना  


 अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा  एकाने धक्काबुक्की करून  हात पिरगाळल्याची घटना वैजापूर तालुक्यातील जरूळ येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.या घटनेत पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. 



विशाल पडळकर असे जखमी हवालदाराचे नाव आहे.याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून एका जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील जरूळ येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हवालदार विशाल पडळकर, पोलिस पाटील संगीता सूर्यवंशी हे   पंचासह  मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी गेले.त्यावेळी  गणेश हरिश्चंद्र फुलारे हा तेथे आला.  त्याने पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पडळकर यांना धक्काबुक्की केली. 


पडळकर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पडळकर यांचा हात पिरगाळून त्यांना दुखापत केली. पडळकर यांनी  होमगार्ड तुरे व बागुल यांच्या मदतीने  गणेशला ताब्यात घेतले. याप्रकरणी विशाल पडळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून   गणेश हरिश्चंद्र फुलारे (३७  रा. जरूळ) याच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top