जिल्ह्यात वैजापूर तालुका अव्वल
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी वैजापूर तालुक्यातील ५० हजारांपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. पैकी ०३ ऑगस्ट रोजी सकाळपर्यँत ४९ हजार ६४३ अर्जांंना मान्यता देण्यात आली आहे . या योजनेसाठी जिल्ह्यात सर्वाधिक अप्रुव्हल मिळविण्यासाठी वैजापूर तालुका अग्रस्थानी ठरला आहे.
येथील तहसील कार्यालयात आमदार रमेश बोरनारे यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसांपूर्वी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या अनुषंगाने बैठक पार पडली होती. या बैठकीत आ.बोरनारे यांनी योजनेपासून कुणीही पात्र महिला वंचित राहू नये. अशा सूचना संबंधितांंना केल्या होत्या. दरम्यान या योजनेसाठी तालुकास्तरीय समितीला एकूण ५० हजार ५४८ अर्ज प्राप्त झाले. यापैकी ४९ हजार ६४३ अर्ज अप्रुव्ह करण्यात आले आहेत. उर्वरित ९०५ अर्जात त्रुट्या आढळून आल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
या योजनेसाठी अर्ज अप्रुव्हल देण्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून वैजापूर अव्वल ठरले आहे. दरम्यान त्रुटी आढळून आलेल्या अर्जधारक महिला या योजनेसाठीच्या नियम व अटींंच्या आधीन राहून अंतिम तारखेपर्यँत योग्य कागदपत्रांसह पुन्हा अर्ज सादर करू शकता. या योजनेसाठी तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन कर्मचारी दीपक त्रिभुवन, बिंबीसर कावळे, रईस शेख, सचिन गायकवाड, प्रवीण गायकवाड, संतोष जाधव, दिलीप त्रिभुवन, कैलास बहुरे, गोसावी, अमोल जाधव, सुखदेव राठोड, मुदिराज, विजय वाळुंज यांनी काम केले.
छाया स्त्रोत - गुगल