MLA Ramesh Bornare | मतदारसंघात 'या' योजनेचा 'एवढ्या' रुग्णांना लाभ; काय म्हणाले आमदार बघा !

0

मुख्यमंत्री सहाय्यता निधी 


शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षेला (Chief Minister Assistance Fund) गेल्या दोन वर्षांत चालना मिळाली असून यामुळे उपचारासाठी सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य मिळण्यास मदत होत आहे. या कक्षेमुळे वैजापूर विधानसभा मतदारसंघातील आतापर्यंत १५३ रुग्णांना लाभ मिळाला असल्याची माहिती शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी दिली.


वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सोबत अन्य कार्यकर्ते.

आमदार रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दोन वर्षांत आतापर्यंत राज्यातील ३६ हजार रुग्णांना ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात गरजू व गरीब रुग्णांना या निधीचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील १५३ रुग्णांना या निधीतून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. त्यांना एक कोटी ३० लाख रुपयांची वैद्यकीय मदत मिळवून दिली.



 एकवेळ विकासकामे थांबले तरी चालतील. परंतु उपचाराविना कुणी राहता कामा नये. हाच प्रयत्न माझा यापुढेही राहणार आहे. तसेच तालुक्यातील पालखेडसह कन्नड तालुक्यातील मृत प्रत्येकी चार जणांना या निधीचा फायदा झाला. यापुढेही या निधीतून गरजूंना अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणार असल्याचे आमदार बोरनारे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनीही यावेळी भ्रमणध्वनीवरून पत्रकारांशी संवाद साधला.पत्रकार परिषदेस रामहरी राऊत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, संजय बोरनारे, रणजित चव्हाण, रामचंद्र शेळके, बाळू जाधव, अमोल बोरनारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्या आजारांवर होतात उपचार?

कॉकलिअर इम्प्लांट प्रत्यारोपण, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडनी प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण,बोन मॅरो प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग, अपघात, लहान बालकांची शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसीस, कर्करोग -किमोथेरपी /रेडीएशन, खुब्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशुंचे आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण,बर्न रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण आदी उपचारांचा यात समावेश आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top