Fraud OF Billions | 'ज्ञानराधा'चा २०० ठेवीदारांना गंडा; कोट्यवधी रुपयांचा घोटाळा

2 minute read
0

संस्थापकासह चौघांविरुद्ध गुन्हा


 

छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श घोटाळा गाजत असतानाच वैजापूर येथेही असाच घोटाळा उघडकीस आला. गेल्या कित्येक दिवसांपासून ठेवीदारांना रक्कम परत न करणाऱ्या को - आॅपरेटिव्ह सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जास्तीचे व्याज देण्याचे आमिष  दाखवून अनेक ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापकासह चार जणांविरुद्ध वैजापूर पोलिस अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोसायटीने २०० ठेवीदारांना गंडविल्याचे समोर आले आहे. 

 

वैजापूर येथील याच ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीने ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. 


संस्थापक सुरेश ज्ञानोबा कुटे (बीड), शाखा व्यवस्थापक प्रियवृत त्र्यंबक देवकर रा. जीवनगंगा सोसायटी, आमटे, बिझनेस प्रमोटर अर्चना कुटे रा. बीड व रिजनल हेड सचिन लाखे रा. वैजापूर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ठेवीदार ज्ञानदेव शेळके ( रा. शंकरनगर, वैजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१७ च्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीचे काही कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ठेवींवर जास्त मोबदला देण्याचे आमिष दाखवून सोसायटीमध्ये खाते उघडण्यास सांगितले.


 शेळके यांच्या मित्रांनी ही या पतसंस्थेमध्ये खाते उघडल्याने त्यांचा पतसंस्थेवर विश्वास बसला व त्यांनी बचत खाते उघडून मुदत ठेवींमध्ये १६ लाख ७७ हजार १७१ रुपये व बचत खात्यामध्ये १२ हजार ८२९ असे सोळा लाख ९० हजार रुपये ठेवले. एवढेच नव्हे तर त्यांची मुलगी वैशाली सुधाकर डगळे ( रा. उक्कडगाव रस्ता ) तिनेही सोसायटीमध्ये बचत खाते उघडून दीड लाख रुपयांच्या मुदत ठेवी ठेवल्या. मात्र २०२३ च्या ऑक्टोबर महिन्यात शेळके हे पैशांची गरज असल्याने सोसायटीमध्ये पैसे काढण्यासाठी गेले असता व्यवस्थापक देवकर यांनी सोसायटीमध्ये पैसे उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना परत पाठविले. त्यानंतर ही शेळके यांनी अनेकवेळा सोसायटीमध्ये चकरा मारल्या. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर मे २०२४ मध्ये ज्ञानराधाला टाळे ठोकल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेळके यांच्यासह जवळपास २०० ठेवीदारांच्या लक्षात आले. 


तपास अर्थिक गुन्हे शाखेकडे 

या प्रकरणात शेळके यांची १८ लाख ४० हजार रुपयांची तर तालुक्यातील नागमठाण येथील बाबासाहेब खुरुद व त्यांची पत्नी संगीता यांची पाच लाख २२ हजार रुपये, मोहन दिवटे व त्यांची पत्नीशीला दिवटे यांची १७ लाख तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणातील तक्रारदार व अन्य ठेवीदारांची चाळीस लाख ९२ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास छत्रपती संभाजीनगर येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top
{\rtf1\ansi\ansicpg1252\deff0\nouicompat\deflang1033{\fonttbl{\f0\fnil\fcharset0 Calibri;}} {\*\generator Riched20 10.0.22621}\viewkind4\uc1 \pard\sa200\sl276\slmult1\f0\fs22\lang9 \par }