Crime against police | कामचुकारपणा भोवला; 'त्या' पोलिसाविरुद्ध गुन्हा

0

गुन्ह्यांची कागदपत्रे ठेवली स्वतःकडेच 



 गुन्ह्यांची कागदपत्रे न्यायालयात  अथवा पोलिस ठाण्यात दाखल न करता स्वतःकडेच ठेऊन तपासासाठी देण्यात आलेल्या प्रकरणांंचा निपटारा न करणाऱ्या हवालदाराविरुद्ध (Head Constable) वैजापूर पोलिस ठाण्यात (Vaijapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




 संतोष रतन सोनवणे ( पद : पोलिस हवालदार ब. नं. ६८७, पोलिस ठाणे, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सोनवणे मागील काही वर्षांपासून वैजापूर पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. दरम्यान सोनवणेंकडे २०२२ ते २०२४ या कालावधीत विविध प्रकरणातील तपास सोपविण्यात आला होता. यामध्ये २०२२ मधील १ अकस्मात मृत्यू, वर्ष - २०२३ मधील ४ अकस्मात मृत्यू व ११ इतर गुन्हे तर  २०२४ मधील ६ अकस्मात मृत्यू व २२ इतर गुन्हे त्यांच्याकडे तपासासाठी देण्यात आले होते. 


परंतु त्यांनी या प्रकरणाच्या तपासात दिरंगाई केली व सदर प्रकरणांंची कागदपत्र देखील   न्यायालयात अथवा पोलिस ठाण्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवली. यामुळे या सर्व प्रकरणातील फिर्यादींंना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सदरील प्रकरणांंचा लवकरात-लवकर निपटारा करण्याचे तोंडी व लेखी आदेश वरिष्ठांनी त्यांंना दिले होते. परंतु ही बाब सोनवणे यांनी गंभीरतेने घेतली नाही. त्यामुळे अखेर त्यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top