नातलगांना मानसिक त्रास
वैजापूर शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडी नेहमीच समस्येचा विषय आहे. सोमवारी आठवडी बाजार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. या वाहतुकीच्या कोंडीत अंत्ययात्रा अडकल्याने याचा नाहक मानसिक त्रास नातलगांना सहन करावा लागला.
वैजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक कोंडीत अंत्ययात्रा अशी अडकली. |
शहरात सोमवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सर्वत्र लांबच लांब वाहतूक कोंडी झाल्याने या मार्गावर बस, रिक्षा व दुचाकींच्या लांबच लांब रांगा लागल्याने अंत्ययात्रा काही काळ अडकून पडली. कुटुंबातील सदस्यांना खूप त्रास सहन करावा लागला.खरे तर वैजापूर शहरात तालुका स्तरावरील आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिक शहरात येतात. छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्ग शहराच्या मध्यभागी असल्याने सतत ये-जा असते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चारही दिशांनी येणारी वाहने मध्यभागी चौकात अडकतात. सोमवारी सकाळपासून या चौकात वाहतुकीची कोंडी होत होती. दिवसभर चौकात मोठी वाहने अडकल्याने नागरिक त्रस्त झाले होते.यावेळी समशानभूमी घाटाकडे जाणाऱ्या वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्यानंतर अंत्ययात्रा मार्गस्थ झाली.