Suicide | 'त्याने' छताला ओढणी बांधली अन् संपवली जीवनयात्रा !

0

वैजापूर शहरातील घटना  



वैजापूर शहरातील कादरीनगर परिसरातील तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना ०५ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.


अजीज शेख


 अजीज रज्जाक शेख (३२) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजीज हा  शहरातील कादरीनगर परिसरात कुटुंबीयांसह रहिवासास होता. बुधवारी सकाळी त्याने राहत्या घरी ओढणीच्या साह्याने छताला गळफास लावून घेतला. घडलेला प्रकार कुटुंबातील सदस्यांना समजताच त्यांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास  हवालदार योगेश झाल्टे करीत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top