Illegal | पोलिसांनी केली जनावरांची सुटका; साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल 



 वैजापूर-कोपरगाव रस्त्यावर  पोलिसांनी पिकअप पकडून वाहनातून सहा गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदा वाहतूक होत असताना हे वाहन जनावरांसह हस्तगत करून गायीची सुटका केली. या कारवाईत वाहन व  गायीसह असा तीन लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



वैजापूर पोलिसांनी हाच पिकअप पकडून जनावरांची सुटका केली. 

नईम नियाज शेख (रा.संजयनगर, कोपरगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   सोमवारी वैजापूर पोलिसांना 'डायल-११२' या क्रमांकावर कॉल करून कॉलरने माहिती दिली कि, शहरालगत असलेल्या बेलगाव रस्त्याने वाहनात जनावरांची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे हवालदार अविनाश भास्कर, पोलिस कॉन्स्टेबल तिरथ पंडुरे आदींनी दुपारी दोन वाजेच्या सुमारास माहितीतील ठिकाणी धाव घेतली असता पोलिसांना महिंद्रा पिकअप बोलेरो वाहन आढळून आले. 


या गाडीची तपासणी केली असता त्यात पाच गायी व एक वासरू अशी सहा गोवंश जातीची जनावरे आढळून आली. यावेळी पथकाने चालकाकडे वाहतूक परवान्याबाबत चौकशी केली असता त्याच्याजवळ कुठलाही परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी अडीच लाख रुपये किंमतीची गाडी व सहा जनावरे असा मुद्देमाल हस्तगत केला याप्रकरणी पंडुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार किसन गवळी हे करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top